News Flash

IPL 2021 : CSK चा ‘स्टार’ क्रिकेटपटू बिग बॉसमध्ये जाणार?; VIDEO मध्ये म्हणाला…

CSK संघानं एक VIDEO शेअर केला असून, यात 'त्यानं' बिग बॉसमध्ये जाण्याबाबत सांगितलं आहे.

Suresh raina hints at taking part in reality tv show bigg boss
चेन्नई सुपर किंग्ज आणि बिग बॉस

आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैना चेन्नई सुपर किंग्जकडून (सीएसके) धमाल करताना दिसणार आहेत. मागील वर्षी सीएसकेने लीगमध्ये सुमार कामगिरीचे प्रदर्शन केले होते. रैनाने वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली होती. पण आता यंदा रैना खेळत आहे. संघही कमालीच्या फॉर्मात असून गुणतालिकेत १० गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. या स्पर्धेदरम्यान रैनाने एका लोकप्रिय रिअॅलिटी टेलिव्हिजन शोमध्ये स्पर्धक होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

आयपीएल २०२१च्या १४व्या हंगामाचा दुसरा टप्पा सुरू होण्याआधी सुपरस्टार रैनाने सीएसकेशी संभाषणात भाग घेतला. या खास संभाषणात रैनाची पत्नी प्रियंकाही सहभागी झाली होती. तेव्हा एका प्रश्नाला उत्तर देताना रैना म्हणाला, ”लोकप्रिय टीव्ही शो – बिग बॉसच्या दक्षिण भारतीय पर्वात सहभागी होण्यास मला हरकत नाही. मी ते पाहिले आहे. त्यांची भाषा शिकण्याची गरज आहे.”

हेही वाचा – US Open Final : रागारागात रॅकेट तोडलं, त्यानंतर टॉवेलमध्ये रडू लागला जोकोव्हिच..! पाहा VIDEO

या संभाषणात सुरेश रैनाने साऊथचा सुपरस्टार सर्या हा आवडता अभिनेता असल्याचे सांगितले आहे. अँड्र्यू सायमंड्स, एस श्रीशांत, सलील अंकोला, विनोद कांबळी, नवज्योत सिंग सिद्धू आणि द ग्रेट खली सारख्या अनेक प्रसिद्ध क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींनी बिग बॉसमध्ये भाग घेतला आहेत.

आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक सामने खेळणाऱ्या आणि सर्वाधिक धावा करणाऱ्यांपैकी एक असलेल्या रैनाला पुन्हा खेळताना पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. रैनाने आयपीएलमध्ये २०० सामने खेळले आहेत. रैनाने आयपीएलच्या २०० सामन्यांमध्ये ५४९१ धावा केल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2021 4:08 pm

Web Title: suresh raina hints at taking part in reality tv show bigg boss adn 96
Next Stories
1 शास्त्री गुरुजी अन् धोनीही संघाची साथ सोडणार; विराटही देणार मोठा धक्का, टीम इंडियाचं कसं होणार?
2 US Open Final : रागारागात रॅकेट तोडली, त्यानंतर टॉवेलमध्ये रडू लागला जोकोव्हिच..! पाहा VIDEO
3 ENG vs IND : ‘‘जर अजिंक्य चांगला खेळला नाही, तर त्याला…”, सेहवागनं स्पष्टच सांगितलं…
Just Now!
X