News Flash

कौतुकास्पद…! सुरेश रैना ३४ व्या वाढदिवसाला करणार ३४ शाळांचा कायापालट

१० हजार मुलांचा होणार फायदा

Suresh Raina 34th birthday : क्रिकेटपटू सुरेश रैनाचा २७ नोव्हेंबर रोजी ३४ वा वाढदिवस आहे. आपल्या वाढदिवसाला सुरेश रैना खास काम करणार आहे. वाढदिवसानिमित्त रैना मुलगी ग्रेसिया हिच्या नावानं सुरु असणाऱ्या ‘ग्रेसिया रैना फाउंडेशन’ अंतर्गत ३४ शाळांचा कायापालट करणार आहे. स्वच्छता आणि पाण्याच्या सोयीसह शाळेतील इतर महत्वाची कामही करणार आहे.

‘ग्रेसिया रैना फाउंडेशन’ अंतर्गत सुरैश रैना उत्तर प्रदेश, जम्मू कश्मीर आणि एनसीआरमधील ३४ शाळांचा विकास करणार आहे. याचा तब्बल १० हजार मुलांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे रैनावर चारीबाजूनं कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावर नेटकरी तोंडभरुन कौतुक करत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशनचा सुरै रैना ब्रँड अँबेसडर आहे.

सुरैश रैना म्हणाला की, शाळांचा विकास करण्याच्या या कामासोबत वाढदिवस साजरा करायला आनंद होत आहे. प्रत्येक विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा हकदार आहे. शाळेतील स्वच्छ पाणी आणि शौचालयासारखी सुविधाही त्यांचा आधिकार आहे. मला आशा आहे की, तरुणाच्या साथीनं ग्रेसिया रैना फाउंडेशन अंतर्गत यामध्ये आम्ही योगदान देम्याचा प्रयत्न करु.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2020 11:37 am

Web Title: suresh raina plans to help 34 schools on his 34th birthday with gracia raina foundation nck 90
Next Stories
1 रोहित शर्माला कर्णधार करण्याविरोधात कपिल देव; सांगितलं कारण
2 IND vs AUS : एकदिवसीय आणि टी-२० मध्ये का वगळलं? रोहित शर्माचा खुलासा
3 आयपीएल’मध्ये खेळण्यास खेळाडूंना बंदी घालावी!
Just Now!
X