न्यूझीलंडविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याला भारतीय संघाचा अष्टपैलू सुरेश रैना याला मुकावे लागणार आहे. सुरेश रैना आजारी असल्याने त्याला पहिला सामना खेळता येणार नसल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(बीसीसीआय) दिली आहे. येत्या १६ ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना धरमशाला येथे खेळविण्यात येणार आहे.

वाचा: अश्विन, जडेजाला विश्रांती; रैनाचे एकदिवसीय संघात पुनरागमन

काही दिवसांपूर्वीच भारताच्या एकदिवसीय संघाची घोषणा करण्यात आली होती. एकदिवसीय संघात सुरेश रैनाची निवड झाल्याने त्याच्या पुनरागमनासाठी चाहते उत्सुक आहेत. पण रैना सध्या आजारी असल्याने पहिला सामना तो खेळू शकणार नाही. उर्वरित सामन्यांत रैना खेळू शकेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

VIDEO: जबरदस्त!! सुरेश रैनाने अफलातून झेल टिपला