26 January 2021

News Flash

VIDEO: रॅपर रैना… पाहा दुबईत काय करतोय CSKचा धडाकेबाज फलंदाज

तुम्ही पाहिलात का सुरेश रैना 'रॅपर' अवतार

IPL 2020ची अधिकृत घोषणा BCCIने ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीलाच केली. युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून स्पर्धेची सुरुवात होणार आहे. तर स्पर्धेचा अंतिम सामना १० नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे हेदेखील स्पष्ट करण्यात आले. ड्रीम ११ला यंदाचे टायटल स्पॉन्सर्स जाहीर करण्यात आले. २० ऑगस्टपासून सर्व संघांना युएईला जाण्याची परवानगी देण्यात आली. त्यानुसार सर्व संघ आणि खेळाडू युएईमध्ये दाखलही झाले. तिथलाच एक व्हिडीओ CSKचा धडाकेबाज फलंदाज सुरेश रैना याने पोस्ट केला आहे.

IPL 2020साठी युएईमध्ये दाखल झालेले खेळाडू सहा दिवस क्वारंटाइन आहेत. IPL व्यवस्थापनाने आखून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे. अशा परिस्थितीत खेळाडूंच्या सुप्त कलागुणांचे दर्शन घडत आहे. चेन्नईचा सुरेश रैना याने एका रॅप साँगचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याच्यातील रॅपरचं दर्शन चाहत्यांना घडलं आहे. युएईमध्ये क्वारंटाइन असल्याने पूर्ण दिवस नेटफ्लिक्स पाहण्यातच जात आहे. बाहेर भटकायला मिळत नसल्याने दुबईतील बुर्ज खलिफा ही वास्तू दिवसागणिक मोठी होताना दिसते आहे, अशा आशयाचं रॅप साँग त्याने व्हिडीओत गायलं आहे.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आपली पत्नी रितिका आणि मुलगी समायरासह युएईला रवाना झाला आहे. तिकडे एका आलिशान हॉटेलमध्ये मुंबई संघाच्या खेळाडूंच्या वास्तव्याची सोय करण्यात आली आहे. तिथला एक व्हिडीओ रोहितनेदेखील पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये रोहित आणि पत्नी रितिका दोघेही तंदुरूस्त राहण्यासाठी वर्कआऊट करताना दिसले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2020 7:25 pm

Web Title: suresh raina turns rapper as sings rap on burj khalifa in uae ipl 2020 vjb 91
Next Stories
1 रोहित-रितीकाच्या वर्कआऊट व्हिडीओवर चहल म्हणतो, भाभी…
2 अश्विनचं ‘मंकडिंग’ पुन्हा चर्चेत; संजय मांजरेकर म्हणतात…
3 ‘या’ क्रमांकावर फलंदाजी करायला आवडेल!
Just Now!
X