03 December 2020

News Flash

IPL : रैनासाठी चेन्नईची दारं बंद?? CSK संघ व्यवस्थापन नाराज

सुरेश रैनाची आयपीएलमधून माघार

सुरेश रैना - ३९ वेळा

खासगी कारण देऊन चेन्नई सुपरकिंग्जचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाने आयपीएलच्या तेराव्या हंगामातून माघार घेतली. २९ ऑगस्ट रोजी CSK चे सीईओ काशी विश्वनाथन यांनी रैना माघार घेत असल्याच्या बातमीला दुजोरा दिला. रैना भारतात परतल्यानंतर त्याने अचानक माघार घेण्याच्या निर्णयावरुन अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, हॉटेलमध्ये मनासारखी रुम मिळाली नसल्याने रैना नाराज झाला होता. CSK चे मालक एन.श्रीनीवासन यांनीही रैनाच्या माघार घेण्याच्या निर्णयावर आश्चर्यवजा नाराजी व्यक्त केली.

“क्रिकेटपटू हे देखील जुन्या कलाकारांसारखेच असतात. चेन्नईच्या संघातील सर्व खेळाडू एका परिवारासारखे राहतात. पण जर तुम्ही खुश नसाल तर तुम्ही परत जाऊ शकता. मी कधीही कोणावरही जबरदस्ती करत नाही, कधीकधी यशाची हवा तुमच्या डोक्यात जाते.” श्रीनीवासन यांनी आपली प्रतिक्रिया दिली. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दुबईत रैनाच्या हॉटेलमधील रुमला गॅलरी नव्हती. CSK संघाच्या नियमांनुसार कर्णधार, प्रशिक्षक आणि व्यवस्थापक यांना हॉटेलमध्ये Suite (प्रशस्त खोल्या) दिल्या जातात. रैनालाही दुबईत अशाच पद्धतीची प्रशस्त खोली मिळाली होती, पण फक्त त्याच्या खोलीला गॅलरी नसल्यामुळे तो नाराज होता.

श्रीनीवासन यांनी सध्याच्या हंगामासाठी संघाची दारं रैनासाठी खुली ठेवलेली असली तरीही यंदाच्या हंगामासाठी रैना परतणार नाहीये. काही सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चेन्नईच्या संघातील रैनाचे दिवस आता संपले असून २०२१ साठी रैनाला कदाचीत पुन्हा एकदा लिलावात उतरावं लागेल. चेन्नईच्या संघ व्यवस्थापनातील वरिष्ठ अधिकारी रैनाच्या वागण्यावर खुश नाहीत. त्यामुळे आगामी हंगामासाठी रैनाला लिलावात उतरावं लागेल आणि कादाचीत दुसरा एखादा संघ त्याला निवडू शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडत आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2020 3:28 pm

Web Title: suresh raina unlikely to play for chennai super kings again psd 91
Next Stories
1 IPL 2020 : CSK संघात नाराजीनाट्य?? केदारचा नाव न घेता रैनाला टोला
2 पाकिस्तानच्या हाफीजचा विक्रम! ‘अशी’ कामगिरी करणारा पहिलाच पुरूष क्रिकेटपटू
3 जोपर्यंत शरीर साथ देतंय, तोपर्यंत खेळत राहीन ! – इशांत शर्माचा निर्धार
Just Now!
X