28 September 2020

News Flash

सुरियाला अखेरचे स्थान

दहा हजार मीटर शर्यतीत ३२:२३.५६ सेकंदांसह वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी

मोहम्मद अनास

दहा हजार मीटर शर्यतीत ३२:२३.५६ सेकंदांसह वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी

कारकीर्दीमधील वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीदेखील पदकासाठी खूप कमी पडते, असा अनुभव भारताच्या सुरिया लोगानाथनबाबत पाहायला मिळाला. तिने १० हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली, मात्र तिला १३वे स्थान मिळाले. गोळाफेकीत भारताच्या तेजिंदरपाल सिंगला आठव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

सुरियाच्या शर्यतीत फक्त १३ खेळाडूंचा समावेश होता. परंतु तिने निराशा केली. तिने हे अंतर ३२ मिनिटे २३.५६ सेकंदांत पार केले. तिची यापूर्वीची ३२ मिनिटे २३.९६ सेकंद अशी सर्वोत्तम कामगिरी होती. युगांडाच्या स्टेला चेसांगने हे अंतर ३१ मिनिटे ४५.३० सेकंदात पार करीत सुवर्णपदक जिंकले. स्टेसी निदिवा (३१ मिनिटे ४६.३६ सेकंद) व मेर्सिलाइन चेलांगट (३१ मिनिटे ४८.४१ सेकंद) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक पटकावले.

गोळाफेकीत तेजिंदरला स्वत:ची २०.४० मीटर ही वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीही ओलांडता आली नाही. त्याने येथे १९.४२ मीटपर्यंत गोळाफेक केली. सहा प्रयत्नांपैकी चार प्रयत्नांमध्ये त्याने १९ मीटरपेक्षाही कमी कामगिरी केली. त्याचा एक प्रयत्न ग्रा धरण्यात आला नाही. ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत मोहम्मद अनासने अंतिम फेरीत स्थान मिळवले. त्याची अंतिम शर्यत मंगळवारी होणार आहे. त्याने हे अंतर ४५.४४ सेकंदांत पूर्ण केले. ४५.४० सेकंद हा राष्ट्रीय विक्रम त्याच्याच नावावर आहे. या शर्यतीत अंतिम फेरी गाठण्याचा मान यापूर्वी ऑलिम्पिकपटू मिल्खा सिंग यांनी १९५८मध्ये मिळवला होता. मिल्खा सिंग यांनी त्या वर्षी सुवर्णपदकजिंकताना ४६.६ सेकंद वेळ नोंदवली होती.

पुरुषांच्याच उंच उडीत तेजस्विन शंकरने अंतिम फेरीकडे वाटचाल केली. त्याने पात्रता फेरीतील ‘अ’ विभागात पाचवे स्थान घेतले व एकुणात त्याला नववा क्रमांक मिळाला. त्याने २.२१ मीटपर्यंत उडी मारली. त्याने यापूर्वी राष्ट्रकुल युवा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. त्याने फेडरेशन चषक स्पर्धेत २.२८ मीटपर्यंत उडी मारून राष्ट्रकुलची पात्रता पूर्ण केली होती.

महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत हिमा दास हिने उपांत्य फेरीत स्थान मिळवले. तिने हे अंतर ५२.११ सेकंदांत पार केले. तिची सहकारी व अनुभवी खेळाडू एम.आर.पुवम्माला उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले.

तिने ही शर्यत ५३.७२ सेकंदांत पूर्ण केली आणि एकंदर २४वे स्थान घेतले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2018 1:55 am

Web Title: suriya loganathan indian olympic athlete mohammed anas commonwealth games 2018
Next Stories
1 बोल्टचा पठ्ठय़ा योहान ब्लॅक तिसरा
2 IPL 2018: ‘हा’ संघ आयपीएल ट्रॉफी जिंकत रचणार इतिहास; सट्टा बाजार गरम
3 सुवर्णअध्याय, सांघिक बॅडमिंटन प्रकारात भारतीय संघाला पहिलं सुवर्णपदक
Just Now!
X