29 November 2020

News Flash

सूर्यकुमार ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विजयवीराच्या भूमिकेत?

मुंबई इंडियन्सकडून खेळताना सूर्यकुमारने ‘आयपीएल’मध्ये १० सामन्यांत एकूण २४३ धावा केल्या आहेत

मुंबई : देशांतर्गत क्रिकेटमध्ये गेली दहा वष्रे सातत्यपूर्ण फलंदाजी करणाऱ्या सूर्यकुमार यादवला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीनंतर निवड समिती विजयवीराची भूमिका पार पाडू शकणाऱ्या मधल्या फळीतील फलंदाजाचा शोध घेत आहे.

मुंबई इंडियन्सकडून खेळताना सूर्यकुमारने ‘आयपीएल’मध्ये १० सामन्यांत एकूण २४३ धावा केल्या आहेत. त्यामुळेच त्याच्या नावाला पंसती मिळण्याची शक्यता आहे. २०१२ मध्ये सूर्यकुमारचे नाव सर्वप्रथम निवड समितीच्या चर्चेत आले होते. पण ती संधी हुकल्यानंतर भारत ‘अ’ संघात त्याने अनेकदा प्रतिनिधित्व केले. वर्षांच्या पूर्वार्धात भारत ‘अ’ संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यातही खेळला होता. मार्च महिन्यात न होऊ शकलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठीही त्याचे नाव चर्चेत आले. पण निवड समितीने त्याला संघात स्थान दिले नाही. पुढील महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताच्या महासंघाची निवड होणार असून सूर्यकुमारची प्रतीक्षा संपण्याची चिन्हे आहेत.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये के. एल. राहुल विजयवीराची भूमिका बजावतो, पण ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये तो सलामीला उतरतो. श्रेयस अय्यर आणि मनीष पांडे हे दोघे ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये मधल्या फळीत खेळून ही जबाबदारी पार पाडतात.

प्रसिद्ध कृष्णालाही भारतीय संघात स्थान मिळू शकते.  ‘आयपीएल’मध्ये तो कोलकाता नाइट रायडर्सचे प्रतिनिधित्व करीत आहे. आफ्रिकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी निवड झालेल्या शुभमन गिलचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विचार केला जाणार नाही.

न्यूझीलंड दौऱ्यावरील कसोटी आणि एकदिवसीय मालिकेला मुकलेला रोहित शर्मा मर्यादित षटकांच्या क्रिकेटसह कसोटी मालिकेतही सलामीच्या स्थानासाठी शर्यतीत आहे. शिखर धवनची ट्वेन्टी-२० संघात निवड होऊ शकेल, परंतु अंतिम संघात त्याच्या निवडीची शक्यता कमी आहे. या आठवडय़ात सुनील जोशी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय निवड समिती ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघ निवड जाहीर करण्याची शक्यता आहे.

पुजारा, हनुमा दुबईमध्ये दाखल

नवी दिल्ली : भारताच्या कसोटी संघाचे फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारी हे रविवारी दुबईमध्ये दाखल झाले आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा संघ दुबईतूनच रवाना होणार असल्याने ‘आयपीएल’मध्ये न खेळणाऱ्या खेळाडूंसह साहाय्यक मार्गदर्शकांना येथे बोलावण्यात आले आहे. यात भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचाही समावेश आहे. ‘आयपीएल’च्या जैव-सुरक्षित वातावरणात मात्र शास्त्री, विहारी, पुजारा यांना राहता येणार नाही. दुबईमध्ये सहा दिवसांचे विलगीकरणही त्यांच्यासाठी सक्तीचे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2020 2:51 am

Web Title: suryakumar in the role of winner for australia tour zws 70
Next Stories
1 ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणे आव्हानात्मक!
2 ग्रँडमास्टर किताब पटकावण्याचे भक्तीचे ध्येय!
3 पोर्तुगीज ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यत : हॅमिल्टनचे विक्रमी ९२वे जेतेपद