News Flash

तेरा टाईम आएगा ! सूर्यकुमार यादवला ‘दादा’चं आश्वासन

सूर्यकुमार यादवला संघात स्थान न मिळाल्याने चाहते नाराज

टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सुनिल जोशी यांच्या निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली. भारतीय संघात रोहित शर्माला दुखापतीमुळे न मिळालेलं स्थान आणि सूर्यकुमार यादवकडे झालेलं दुर्लक्ष हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा मुद्दा ठरला होता. गेल्या काही हंगामांमध्ये स्थानिक क्रिकेट आणि आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतरही सूर्यकुमारला भारतीय संघात स्थान मिळत नसल्यामुळे चाहते नाराज होते. अखेरीस बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने सूर्यकुमार यादवला संधी न मिळण्याबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे.

“सूर्यकुमार यादव चांगला खेळाडू आहे, त्याचीही वेळ येईल.” सूर्यकुमार व्यतिरीक्त यंदाच्या आयपीएलमध्ये संजू सॅमसन, राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती, शुबमन गिल, देवदत पडीकल यासारख्या तरुण खेळाडूंनीही आपली छाप पाडल्याचं गांगुलीने हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना सांगितलं.

अवश्य वाचा – …म्हणून सूर्यकुमारला भारतीय संघात जागा नाही ! रवी शास्त्रींनी सांगितलं कारण

भारतीय संघाची निवड झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने RCB विरुद्ध सामन्यात नाबाद अर्धशतकी खेळी करत मुंबईला विजय मिळवून दिला होता. त्याच्या या खेळीनंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सूर्यकुमार यादवला संयम बाळगण्याचा सल्ला दिला होता. १० नोव्हेंबरला आयपीएलचा तेरावा हंगाम संपल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघ ३ वन-डे, ३ टी-२० आणि ४ कसोटी सामने खेळणार आहे. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये सूर्यकुमारला भारतीय संघात जागा मिळते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – रोहितच्या निवडीबद्दल रवी शास्त्रींना माहिती नसणं यावर विश्वास बसत नाही – सेहवाग

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2020 4:04 pm

Web Title: suryakumar yadav is a very good player his time will come soon says bcci president sourav ganguly psd 91
Next Stories
1 मार्लन सॅम्यूएल्सची निवृत्ती
2 अपयशातून सावरताना धोनीचा कानमंत्र उपयुक्त -ऋतुराज
3 चॅम्पियन्स लीग फुटबॉल : बायर्नचा विक्रमी विजय
Just Now!
X