आयपीएलच्या तेराव्या हंगामापासून धडाकेबाज फलंदाजीने चर्चेत असलेला सूर्यकुमार यादव आगामी सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत मुंबईच्या संघाचं नेतृत्व करणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने २० सदस्यीय संघाची घोषणा केली असून आदित्य तरेकडे संघाचं उप-कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. जानेवारी २०२१ मध्ये बीसीसीआय सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेने स्थानिक क्रिकेट हंगामाची सुरुवात करणार आहे.

संघाची निवड करण्याआधी MCA ने आपल्या खेळाडूंसाठी सराव सामने खेळवले होते, ज्यात सूर्यकुमारने आश्वासक खेळी करत पुन्हा एकदा आपला फॉर्म सिद्ध केला होता. २९ डिसेंबरपासून मुंबईचा संघ सरावाला सुरुवात करणार असून त्याआधी संघातील सर्व खेळाडूंना कोविड चाचणी करुन येणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

असा असेल मुंबईचा संघ –

सूर्यकुमार यादव (कर्णधार), आदित्य तरे (उप-कर्णधार), यशस्वी जैस्वाल, आकर्षित गोमेल, सर्फराज खान, सिद्धेश लाड, शिवम दुबे, शुभम रांजणे, सुजित नायक, साईराज पाटील, तुषार देशपांडे, धवल कुलकर्णी, मिनाद मांजरेकर, प्रथमेश डाके, अथर्व अंकोलेकर, शशांक अत्राडे, शम्स मुलानी, हार्दिक तामोरे, अक्ष पारकर, सुफियान शेख