News Flash

सुशांतचा ‘दिल बेचारा’ पाहून भारतीय क्रिकेटर झाला भावूक, म्हणाला…

सुशांतच्या शेवटच्या चित्रपटाने साऱ्यांनाच रडवलं...

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा ‘दिल बेचारा’ हा अखेरचा ठरलेला चित्रपट २४ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेक जण सुशांतच्या आठवणीत भावूक झाले. अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. यात चाहत्यांपासून ते अगदी सेलिब्रिटींचाही समावेश आहे. भारताचा क्रिकेटरदेखील दिल बेचारा चित्रपट पाहून भावनिक झाल्याचे दिसून आले.

भारताचा क्रिकेटर मनोज तिवारी याने आपल्या ट्विटर अकाऊंटवर सुशांतचा दिल बेचारा चित्रपटातील एक फोटो पोस्ट करत आपल्या भावनांना वाट करून दिली. “काल दिल बेचारा चित्रपट पाहिला. चित्रपटात कलाकारांनी अप्रतिम अभिनय केला आहे. चित्रपट अतिशय सुंदर आहे. चित्रपटाने सर्वांसाठी एक छान संदेश दिला आहे. मी वेगवेगळ्या कारणांमुळे चित्रपट पाहताना रडलो. पण एक गोष्ट नक्की की हा चित्रपट ब्लॉकबस्टर आहे”, असे ट्विट त्याने केले.

दिल बेचारा चित्रपट पाहून सुशांतची जवळची मैत्रिण अंकिता लोखंडे हिच्याही अश्रूंचा बांध फुटला. तिने ट्विटरच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या. सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याचा ‘दिल बेचारा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. परंतु, हे यश पाहण्यासाठी सुशांत आपल्यात नसल्याची जाणीव चाहत्यांना आणि सुशांतच्या कुटुंबीयांना सतत होत असल्यामुळे ते भावूक झाले आहेत. त्यामुळे अंकितानेदेखील ‘One last time…’ अशा मोजक्या शब्दांत सुशांतप्रतीचं प्रेम व्यक्त केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2020 4:59 pm

Web Title: sushant singh rajput dil bechara movie team india cricketer manoj tiwary post emotional message on twitter vjb 91
Next Stories
1 कसोटीनंतर क्रिकेट चाहत्यांना आता वन-डे क्रिकेटची पर्वणी
2 ENG vs WI : कर्णधार रूटची दमदार खेळी; स्मिथला मागे टाकत मियाँदादच्या विक्रमाशी बरोबरी
3 स्टुअर्ट ब्रॉडचा विक्रम; ‘अशी’ कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज
Just Now!
X