30 September 2020

News Flash

सुशीलला वगळल्याचा महासंघाकडून इन्कार

ऑलिम्पिकच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीमधून सुशील कुमारचे नाव वगळल्याच्या वृत्ताला भारतीय कुस्ती

| May 13, 2016 12:31 am

ऑलिम्पिकच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीमधून सुशील कुमारचे नाव वगळल्याच्या वृत्ताला भारतीय कुस्ती महासंघाने इन्कार केला आहे. ऑलिम्पिकमध्ये कोणते खेळाडू कोणत्या वजनी गटामधून खेळणार आहेत, याची संभाव्य खेळाडूंची आयओएला पाठवायची असते. या संभाव्य यादीमध्ये सुशीलचे नाव नाही, पण याचा अर्थ सुशील ऑलिम्पिकला जाणार नाही, असा होत नाही.
‘‘संभाव्य खेळाडूंची यादी भारतीय कुस्ती महासंघाने पाठवलेली नव्हे तर संयुक्त जागतिक कुस्ती संघटनेने पाठवलेली आहे. जेव्हा सर्व पात्रता फेरी पूर्ण होतील, त्यानंतर जागतिक संघटना ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंची यादी करणार आहे आणि ही यादी ऑलिम्पिक महासंघाला पाठवली जाणार आहे,’’ असे भारतीय कुस्ती महासंघाचे सचिव विनोद तोमर यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, ‘‘ऑलिम्पिकमध्ये सुशील जाणार की नरसिंग याबाबतचा निर्णय अजूनही झालेला नाही. हा निर्णय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष घेणार आहेत. त्याचबरोबर या ऑलिम्पिकमधील प्रवेशासाठी या दोन्ही कुस्तीपटूंमध्ये स्पर्धा घेण्यात येणार का, याबाबतही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे सुशील ऑलिम्पिकला जाणार नाही, हा प्रश्नच उपस्थित होत नाही.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2016 12:31 am

Web Title: sushil kumar not in rio probables list
टॅग Sushil Kumar
Next Stories
1 प्रिती झिंटाकडून प्रशिक्षक संजय बांगर यांना शिवीगाळ!
2 ऑलिम्पिकसाठीच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत नाव नसल्याने सुशील कुमार नाराज
3 शशांक मनोहर यांची ‘आयसीसी’च्या चेअरमनपदी बिनविरोध निवड
Just Now!
X