इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स कसोटी सामन्यात झालेल्या खराब कामगिरीचा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला फटका बसलेला आहे. कसोटी क्रमवारीत विराट कोहलीची पहिल्या स्थानावरुन घसरण झाली आहे. बॉल टॅम्परिंग प्रकरणात निलंबनाची शिक्षा भोगत असलेल्या ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथने पहिलं स्थान पटकावलं आहे. दुसऱ्या कसोटीत विराट कोहलीने २३ आणि १७ धावा केल्यामुळे विराटच्या खात्यामधले १५ गुण कमी झाले आहेत.

विराटच्या या खराब कामगिरीचा फायदा ऑस्ट्रेलियाचा निलंबीत कर्णधार स्टिव्ह स्मिथला झाला असून, स्मिथ ९२९ गुणांसह पहिलं स्थान पटकावलं आहे. कोहलीच्या खात्यात सध्या ९१९ गुण जमा आहेत.

आयसीसीची कसोटी क्रिकेटमधली फलंदाजीची ताजी क्रमवारी –

१) स्टिव्ह स्मिथ – ९२९ गुण

२) विराट कोहली – ९१९ गुण

३) जो रुट – ८५१ गुण

४) केन विल्यमसन – ८४७ गुण

५) डेव्हिड वॉर्नर – ८२० गुण