बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तस्किन अहमद आणि डावखुरा फिरकी गोलंदाज अराफत सनी यांच्यावर नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात संशयास्पद गोलंदाजीच्या शैलीचा ठपका ठेवण्यात आला आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकातील सलामीच्या सामन्यात बांगलादेशने ८ धावांनी विजय मिळवला होता.

‘‘तस्किन आणि सनी यांची चेन्नई येथील आयसीसीची मान्यता असलेल्या चाचणी केंद्रात स्वतंत्र चाचणी होणार आहे. सामनाधिकाऱ्यांनी अहवालात नमूद केल्यानंतर सात दिवसांच्या कालावधीत ही चाचणी करणे आवश्यक असते. या चाचणीचा निकाल येईपर्यंत दोन्ही खेळाडूंना गोलंदाजी करण्यास परवानगी असेल,’’ असे आयसीसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.