19 October 2020

News Flash

हॉकी विश्वचषकात एस. व्ही. सुनीलच्या सहभागाबद्दल प्रश्नचिन्ह

सुनीलच्या गुडघ्याला दुखापत

एस. व्ही. सुनील (संग्रहीत छायाचित्र)

नोव्हेंबर महिन्यात सुरु होणाऱ्या हॉकी विश्वचषकाआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. संघाच्या आघाडीच्या फळीतला महत्वाचा खेळाडू एस. व्ही. सुनील गुडघ्याच्या दुखापतीमुळे संघात सहभागी होणार नाहीये. 4 ऑक्टोबर रोजी भारतीय संघाच्या सराव शिबीरात सुनीलला ही दुखापत झाल्याचं समजतं आहे.

या दुखापतीमधून सावरण्यासाठी सुनीलला 4 आठवड्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. 28 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर दरम्यान ओडीशातील भुवनेश्वर येथे हॉकी विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे सुनीलला झालेली दुखापत पाहता त्याला संघात जागा मिळण्याच्या सर्व शक्यता मावळलेल्या दिसत आहेत. पीटीआयशी बोलत असताना, सुनीलने आपल्याला झालेल्या दुखापतीविषयी माहिती दिली.

सध्या सुनील हॉकी इंडियाच्या अधिकृत डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाला आहे. या दुखापतीनंतरही सुनील संघातील सहभागाबद्दल सकारात्मक आहे. माझी दुखापत लवकर बरी झाल्यास मी संघात सहभागी होऊ शकतो, मात्र त्याला झालेली दुखापत पाहता हॉकी इंडिया हा धोका पत्करेल का हा मोठा प्रश्नच आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2018 2:03 pm

Web Title: sv sunil in serious doubt for hockey world cup due to knee injury
Next Stories
1 IND vs WI : टीम इंडियाच्या मदतीला धावून आला ‘हा’ नवा सहकारी…
2 IND vs WI : दुसऱ्या कसोटीसाठी मुंबईकर शार्दुल ठाकूरचा संघात समावेश
3 लारापेक्षा सचिनलाच माझी पसंती!
Just Now!
X