News Flash

सिंधू, श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत

सात्त्विकसाइराज रंकीरेड्डीने दुहेरी विजयाची नोंद करताना दोन गटांत उपांत्यपूर्व सामन्यातील स्थान पक्के केले.

(संग्रहित छायाचित्र)

स्विस खुली बॅडमिंटन स्पर्धा

पी. व्ही. सिंधू आणि किदम्बी श्रीकांत यांनी गुरुवारी स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत अनुक्रमे महिला आणि पुरुष एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. सायना नेहवालला पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. सात्त्विकसाइराज रंकीरेड्डीने दुहेरी विजयाची नोंद करताना दोन गटांत उपांत्यपूर्व सामन्यातील स्थान पक्के केले.

दुसऱ्या मानांकित सिंधूने अमेरिकेच्या आयरिस वांगला अवघ्या ३५ मिनिटांत २१-१३, २१-१४ अशी धूळ चारली. सिंधूची उपांत्य फेरीत बुस्नान ओंगबामरंगफानशी गाठ पडणार आहे. थायलंडच्या फिट्टापोर्न चैवानने सायनाला २१-१६, १७-२१, २३-२१ असे नमवले.

पुरुष एकेरीत श्रीकांतने फ्रान्सच्या थॉमस रॉक्सेलला २१-१०, १४-२१, २१-१४ असे पराभूत केले. उपांत्यपूर्व लढतीत श्रीकांतचा कांता वँगचोरेनशी सामना होईल. अजय जयरामने डेन रास्मस गेमकेवर २१-१८, १७-२१, २१-१३  अशी सरशी साधली. बी. साईप्रणितने पाब्लो अ‍ॅबिनला २१-१७, २१-१२ असा फडशा पाडला.

मिश्र दुहेरीत सात्त्विक-अश्विनी पोनप्पा यांनी रिनोव्ह रिव्हाल्डी आणि पिथा हॅनिंगत्यास यांच्यावर २१-१८, २१-१६ अशी मात केली. पुरुष दुहेरीत चिरागसह खेळताना सात्त्विकने प्रमोद कुसुमवर्दना आणि एरिच रॉम्बितान यांना २१-१७, २०-२२, २१-१७ असे पराभूत केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2021 12:19 am

Web Title: swiss open badminton tournament sindhu srikanth in the semifinals abn 97
Next Stories
1 IND vs ENG : इंग्लंडचं लोटांगण; भारताची अडखळत सुरूवात
2 Ind vs Eng: “कोणीतरी खूप चिडलंय”, पंतने इंग्लंडच्या फलंदाजाला डिवचलं अन् पुढच्याच चेंडूवर….
3 Ind vs Eng : इंग्लंडचा निम्मा संघ गारद, अर्धशतक झळकावून बेन स्टोक्सही तंबूत
Just Now!
X