04 March 2021

News Flash

स्वित्झर्लंडसाठी विजय अनिवार्य

फ्रान्सकडून झालेल्या मानहानीकारक पराभवाने स्वित्झर्लंडची वाताहत झाली असली तरी त्यांना बाद फेरीत पोहोचण्यासाठी अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे.

| June 25, 2014 01:49 am

फ्रान्सकडून झालेल्या मानहानीकारक पराभवाने स्वित्झर्लंडची वाताहत झाली असली तरी त्यांना बाद फेरीत पोहोचण्यासाठी अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. स्वित्झर्लंडचा साखळीतील अखरेचा सामना होंडुरासबरोबर होणार असून त्यांनी हा सामना मोठय़ा फरकाने जिंकल्यास त्यांना बाद फेरीत पोहोचता येऊ शकेल. होंडुरासला दोन्ही सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागल्याने त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी सामना बरोबरीत सोडवणेदेखील महत्त्वाचे असेल, पण स्वित्झर्लंडसाठी हा सामना महत्त्वाचा असेल.
सामना क्र. ४१
‘इ’ गट : स्वित्झर्लंड वि. होंडुरास
स्थळ :   एरिना अ‍ॅमाझोनिया, मनाऊस
वेळ :  मध्यरात्री १.३० वा. पासून

‘इ’ गटात काय घडेल?
१. फ्रान्सने बाद फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे.
२. गोलफरकामध्ये इक्वेडोरची स्थिती चांगली आहे.
३. इक्वेडोरचा संघ विजयी ठरला तर स्वित्र्झलडला होंडुरासला मोठय़ा फरकाने पराभूत करून बाद फेरी गाठता येईल.
४. इक्वेडोरचा संघ पराभूत झाला तरी बाद फेरीत पोहोचण्यासाठी स्वित्झर्लंडला विजय मिळवावा लागेल.
५. जर दोन्ही सामने बरोबरीत सुटले तर स्वित्झर्लंडपेक्षा इक्वेडोरला बाद फेरीत जाण्याची नामी संधी असेल.

‘फ’ गटात काय घडेल?
१. दोन्ही सामन्यांत विजय मिळवत सहा गुणांसह अर्जेटिना बाद फेरीत पोहोचला आहे.
२. नायजेरियाच्या संघाच्या खात्यावर चार गुण असून त्यांनी अर्जेटिनाला पराभूत केले तर ते सहजपणे बाद फेरीत पोहोचतील.
३. नायजेरियाचा संघ पराभूत झाला आणि इराणने बोस्नियावर मात केली तर इराण बाद फेरीत पोहोचू शकेल.
४. दोन्ही सामने बरोबरीत सुटल्यास नायजेरियाचा संघ बाद फेरीत पोहोचेल आणि इराणचे आव्हान संपुष्टात येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 25, 2014 1:49 am

Web Title: switzerland need victory against honduras
Next Stories
1 सट्टे पे सट्टा : ब्राझीलच सरस..
2 विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा : फेडररची विजयी सलामी
3 शुमाकरची वैद्यकीय कागदपत्रे गहाळ
Just Now!
X