पहिल्या सामन्यात मिळालेल्या विजयासह बाद फेरीत पोहोचण्याचे ध्येय घेऊन फ्रान्स आणि स्वित्र्झलड हे दोन्ही संघ शुक्रवारी मध्यरात्री एकमेकांसमोर उभे ठाकतील. पहिल्या सामन्यात फ्रान्सने होंडुरासवर सहज विजय मिळवला होता, तर स्वित्र्झलडने इक्वेडोरला पराभूत केले होते. त्यामुळे हा सामना जिंकून बाद फेरीत जाण्याचे ध्येय दोन्ही संघांपुढे असेल. दोन्ही संघांचा विचार केला तर स्वित्र्झलडपेक्षा नक्कीच फ्रान्सचे पारडे जड असून, त्यांचा बाद फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित समजला जात आहे.
या सामन्यात खरे द्वंद्व पाहायला मिळेल ते स्वित्र्झलडचे बचावपटू आणि फ्रान्सचे आक्रमणपटू यांच्यामध्ये. फ्रान्सचा आघाडीचा आक्रमणपटू करिम बेन्झेमाला स्वित्र्झलडचे बचावपटू रोखू शकतील का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. फ्रान्ससाठी हा सामना सोपा वाटत असला, तरी गाफील राहिल्यास त्यांना धक्का देण्याची ताकद स्वित्र्झलडमध्ये आहे. त्यामुळे फ्रान्सने लौकिकाला साजेसा खेळ केला, तर त्यांच्यासाठी बाद फेरीचे दरवाजे खुले होऊ शकतात.
सामना क्र. र५
‘इ’ गट : फ्रान्स वि. स्वित्र्झलड
स्थळ :  अनेना फाँटे नोव्हा, साल्वाडोर
वेळ : मध्यरात्री १२.३० वा.