यूरो कप २०२० स्पर्धेतील स्वित्झर्लंड विरुद्ध वेल्स सामना बरोबरीत सुटला आहे. दोन्ही संघाना प्रत्येक एका गोलवर समाधान मानावं लागलं. पहिल्या सत्रात दोन्ही संघाना एकही गोल करता आला नाही. मात्र दुसऱ्या सत्रात दोन्ही संघानी एक-एक गोल नोंदवला. स्वित्झर्लंडने पहिल्या गोल नोंदवल्यानंतर वेल्स संघावर दडपण आलं होतं. मात्र ७४ व्या मिनिटाला किफर मुरेने गोल करत सामन्यात बरोबरी साधली. सामन्यात सहा मिनिटांचा अतिरिक्त कालावधीही देण्यात आला. मात्र दोन्ही संघ विजयी गोल नोंदवण्यात अपयशी ठरले.

दुसरं सत्र

दुसऱ्या सत्रात स्वित्झर्लंडने केलेल्या पहिल्या गोलनंतर वेल्स संघावर दडपण आलं होतं. मात्र किफर मुरेने गोल करत सामन्यात बरोबरी केली. ७४ व्या मिनिटाला त्याने हा गोल केला. दुसऱ्या सत्राचा खेळ सुरु झाला तेव्हा ४९ व्या मिनिटावर स्वित्झर्लंडच्या ब्रील एम्बोला याने गोल केला होता. त्यामुळे वेल्स संघावर दडपण आल्याने वेल्स संघाचे खेळाडू गोलसाठी धडपड करत होते. मात्र मुरेने गोल केला आणि खेळाडूंना सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान,  दुसऱ्या सत्रात ४७ व्या मिनिटाला वेल्सच्या किफर मुरे याने केलेल्या कृत्याबद्दल मॅच रेफरीने त्याला पिवळं कार्ड दाखवलं. त्यानंतर ६३ व्या मिनिटाला स्वित्झर्लंडच्या केविन म्बाबूने केलेल्या कृतीला मॅच रेफरीने पिवळं कार्ड दाखवलं.

पहिलं सत्र

पहिल्या सत्रात स्वित्झर्लंड आणि वेल्स संघाची गोलसाठी धडपड दिसून आली. दोन्ही संघाच्या खेळाडूंचे प्रयत्न पहिल्या सत्रात तरी अपयशी ठरले. आता दुसऱ्या सत्रात कोणता संघ वरचढ ठरतो याकडे फुटबॉलप्रेमींचं लक्ष लागून आहे. दोन्ही संघाना गोल करण्याची एक एक संधी चालून आली होती. मात्र त्यात ते अपयशी ठरले. स्वित्झर्लंडच्या संघाने ३ फॉल्स तर वेल्सच्या संघाने एक फॉल्स दिला. स्वित्झर्लंडच्या संघाला ६ तर वेल्स संघाला १ कॉर्नर मिळाला. स्वित्झर्लंडच्या फॅबियन शार याला त्याच्या मैदानात केलेल्या कृत्याबद्दल रेफरीने पिवळं कार्ड दाखववलं. पहिल्या सत्रात वेल्स संघानं ११९ वेळा फुटबॉल पास केला. तर स्वित्झर्लंड संघाने ३१७ वेळा पास फुटबॉल पास केला. म्हणजेच पहिल्या सत्रात स्वित्झर्लंड संघाने सर्वाधिक वेळा फुटबॉल आपल्या ताब्यात ठेवला.

हा सामना बरोबरीत सुटल्याने अ गटातील गुणतालिकेत फारसा फरक पडला नाही. इटलीने तुर्कीवर मिळवलेल्या विजयानंतर ३ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. तर वेल्स आणि स्वित्झर्लंड १-१ गुणांसह बरोबरीत आहेत. तर तुर्कीला पहिल्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागल्याने चौथ्या स्थानावर आहे.