News Flash

सिडनी टेनिस स्पर्धा : बोपण्णा-कुरेशी उपांत्य फेरीत

इंडो-पाक एक्स्प्रेस अर्थात रोहन बोपण्णा आणि पाकिस्तानचा ऐसाम उल हक कुरेशी जोडीने सिडनी टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आगेकूच केली.

| January 9, 2014 03:45 am

इंडो-पाक एक्स्प्रेस अर्थात रोहन बोपण्णा आणि पाकिस्तानचा ऐसाम उल हक कुरेशी जोडीने सिडनी टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आगेकूच केली. मात्र राडेक स्टेपानेकच्या साथीने खेळणाऱ्या अनुभवी लिएण्डर पेसला सलामीच्या धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले.
तृतीय मानांकित बोपण्णा-कुरेशी जोडीने ट्रॅट ह्य़ू आणि डॉमिनिक इंगलोट जोडीवर ६-७(३), ७-६(५), १०-३ अशी मात केली. आता त्यांचा मुकाबला अनुभवी ब्रायन बंधूना नमवणाऱ्या ल्युकास रोसोल आणि जाओ सौसा जोडीशी होणार आहे. लिएण्डर पेससाठी मात्र वर्षांची सुरुवात खराब झाली आहे. चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेत साथीदार फॅबिओ फॉगनिनीने दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे पेसला खेळताच आले नाही.  या स्पर्धेत सलामीच्या लढतीतच पराभूत झाल्याने वर्षांतील पहिल्या ग्रँडस्लॅम अर्थात ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेसाठी पुरेशा सरावाविनाच खेळावे लागणार आहे. ज्युलियन बेनटअू आणि इडय़ुअर्ड रॉजर व्ॉसेलिन जोडीने पेस-स्टेपानेक जोडीवर ६-४, ६-४ असा विजय मिळवला. पहिल्या सेटमध्ये निष्प्रभ ठरलेल्या पेस-स्टेपानेक जोडीने दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोही अपुराच ठरला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2014 3:45 am

Web Title: sydney internationalbopanna qureshi progress paes stepanek crash out in sydney
टॅग : Tennis
Next Stories
1 जागतिक हॉकी लीग ; सुनील, वाल्मीकी यांचे भारतीय संघात पुनरागमन
2 शूमाकरचा अपघात सदोष स्कीइंगच्या उपकरणांमुळे नाही
3 क्विटोव्हा, पिरोंकोव्हा उपांत्य फेरीत
Just Now!
X