सिडनी येथे सुरु असलेला भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना रंगतदार अवस्थेत पोहचला आहे. ऋषभ पंत आणि पुजारा यांनी केलेल्या फलंदाजीमुळे सामना रंगतदार अवस्थेत पोहचला आहे. निर्णायक क्षणी पंत ९७ धावांवर झेलबाद झाला. मैदानावर तग धरुन असलेल्या पुजारानं एक बाजू लावून धरली आहे. दुसऱ्या बाजूला हनुमा विहारी आहे. मात्र आतापर्यंत हनुमा विहारीला या मालिकेत लौकिसास साजेशी कामगिरी करता आली नाही. भारतीय संघाची फलंदाजाची ही अखेरच जोडी असेल. त्यानंतर गोलंदाज येतील. जाडेजाला पहिल्या डावांत फलंदाजीदरम्यान दुखापत झाली होती. गरज पडल्यास जाडेजा दुखापतीनंतरही मैदानावर उतरणार, असल्याचं वृत्त आहे.

आणखी वाचा- चेतेश्वर पुजारा ‘सहा हजारी’ मनसबदार; या खेळाडूंनीही केलाय हा कारनामा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जाडेजानं आपल्या अष्टपैलू फंलदाजीमनं सर्वांची मनं जिंकली आहेत. जाडेजानं एकहाती सामनेही फिरवले आहेत. भारतीय संघाला गरज पडल्यास दुखापतग्रस्त जाडेजा मैदानात उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे. ‘भारताला कसोटी वाचवायची असल्यास, जडेजा वेदनाशामक इंजेक्शन घेऊन मैदानात फलंदाजीस उतरण्याची शक्यता आहे,’ असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

आणखी वाचा- ऑस्ट्रेलिायच्या कर्णधाराला आयसीसीनं ठोठावला दंड

तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात जाडेजानं चार बळी घेतले होते. फलंदाजी करताना मिचेल स्टार्कने टाकलेला आखूड टप्प्याचा चेंडू टोलावताना जडेजाचा अंगठा दुखावला गेला. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी करू शकला नाही. जडेजाला बरा होण्यासाठी ४ ते ६ आठवडय़ांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांत खेळू शकणार नाही.