08 July 2020

News Flash

विदर्भचा तामिळनाडूवर विजय

विदर्भने मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेत बलाढय़ तामिळनाडूवर ७ विकेट्सनी मात केली.

शानदार सांघिक कामगिरीच्या जोरावर विदर्भने मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेत बलाढय़ तामिळनाडूवर ७ विकेट्सनी मात केली. विदर्भने तामिळनाडूला १५० धावांतच रोखले. बाबा अपराजितने ४१ तर राजगोपाल सतीशने ३२ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना विदर्भने जितेश शर्माच्या अर्धशतकाच्या बळावर ३ विकेट्सच्या मोबदल्यात हे लक्ष्य गाठले. जितेशने ४७ चेंडूत ९ चौकार आणि एका षटकारासह ७३ धावांची खेळी केली. फैझ फझलने ६ चौकारांसह ४५ धावा केल्या. या दोघांनी ८७ धावांची सलामी देत विदर्भच्या विजयाचा पाया रचला.
संक्षिप्त धावफलक
तामिळनाडू : २० षटकांत ८ बाद १५० (बाबा अपराजित ४१, रवीकुमार ठाकूर २/२२) पराभूत विरुद्ध विदर्भ : १८.३ षटकांत ३ बाद १५३ (जितेश शर्मा ७३, फैझ फझल ४५)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2016 1:36 am

Web Title: syed mushtaq ali trophy 2015 16 vidarbha beat tamil nadu by 7 wickets
Next Stories
1 आयलीग-आयएसएल विलीनीकरणाची शक्यता
2 प्रणव धनावडेला एमसीएकडून दहा हजारांची मासिक शिष्यवृत्ती; शरद पवारांची घोषणा
3 ख्रिस गेलचे ड्रेसिंग रुममध्ये महिलेशी असभ्य वर्तन
Just Now!
X