28 February 2021

News Flash

Video : अभिमन्यूने भेदलं चक्रव्यूह; पाच चेंडूत पाच बळी घेण्याचा अनोखा विक्रम

सामन्याच्या शेवटच्या षटकात पाच विकेट्स मिळवले.

कर्नाटकचा वेगवान गोलंदाज अभिमन्यू मिथुन याने हॅटट्रीक घेत एका षटकात तब्बल पाच विकेट्स घेण्याचा अनोखा विक्रम केला आहे. शुक्रवारी सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत हरियाणा विरोधात खेळताना मिथुनने ३९ धावा देऊन पाच विकेट्स घेतले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याने सामन्याच्या शेवटच्या षटकात पाच विकेट्स मिळवले.

मिथुने शेवटच्या षटकात अनुक्रमे हिमांशु राणा (६१), राहुल तेवतिया (३४), सुमित कुमार (०), अमित मिश्रा (०), जयंत यादव (०) यांना बाद केले. अभिमन्यू मिथुन देशांतर्गत क्रिकेट टी २० सामन्यात हॅटट्रीक घेणारा पहिलाच गोलंदाज आहे. याआधी मिथुनने विजय हजारे क्रिकेट स्पर्धेतही तामिळनाडू विरोधात खेळताना हॅटट्रीक घेतली होती.

हरियाणा आणि कर्नाटक या संघांमध्ये स्पर्धेतील पहिला उपांत्यफेरी सामना खेळला गेला. या सामन्यात हरियाणाने पहिली फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद १९४ धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना कर्नाटक संघाने केवळ १५ षटकात दोन गड्यांच्या मोबदल्यात १९५ धावा करुन सामना जिंकला व अंतिम फेरीत धडक मारली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2019 8:17 pm

Web Title: syed mushtaq ali trophy abhimanyu mithun takes five wickets in an over against haryana mppg 94
Next Stories
1 खयालों में..!! पाकिस्तानच्या खेळाडूचा हा Video पाहून तुम्हीही हसत सुटाल
2 …म्हणून राहुल द्रविड आयपीएलवर नाराज
3 अजिंक्यने कॅच सोडल्यानंतर मलाही आश्चर्य वाटलं !
Just Now!
X