News Flash

हरयाणा विरुद्ध मुंबईच्या वरिष्ठ संघातून अर्जुन तेंडुलकरचे पदार्पण

सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ या स्पर्धेत खेळत आहे.

भारताचे सर्वोत्तम क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने आज मुंबईच्या वरिष्ठ संघातून पदार्पण केले. सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत हरयाणा विरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या संघात अर्जुन तेंडुलकरचा समावेश करण्यात आला. अर्जुन डावखुरी गोलंदाजी करण्याबरोबर उपयुक्त फलंदाजी सुद्धा करतो.

अर्जुन आतापर्यंत विविध वयोगट स्तरांवरील स्पर्धांमध्ये खेळला आहे. सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात त्याचा संघात समावेश करण्यात आला. अर्जुन तेंडुलकरला पहिल्या दोन सामन्यात संधी मिळाली नाही. पण ग्रुप ई च्या तिसऱ्या सामन्यात अर्जुनचा संघात समावेश करण्यात आला.

सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ या स्पर्धेत खेळत आहे. अर्जुनने याआधी भारताच्या वरिष्ठ संघासोबतही नेट गोलंदाज म्हणून दौरा केला आहे. २०१७ साली इंग्लंडच्या वरिष्ठ संघासोबत त्याने सराव केला होता. त्यावेळी यॉर्कर टाकण्याच्या कौशल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

अर्जुन अंडर-१९ आणि अन्य वयोगटातील स्पर्धेत मुंबईकडून खेळला आहे. अर्जुनने २०१८ साली अंडर-१९ स्पर्धेत भारताकडून पदार्पण केले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या अंडर-१९ युथ टेस्ट सीरिजमध्ये त्याचा संघात समावेश करण्यात आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2021 1:33 pm

Web Title: syed mushtaq ali trophy arjun tendulkar makes senior debut for mumbai dmp 82
Next Stories
1 IND vs AUS: लाबूशेनचं दमदार शतक; नवख्या नटराजनचे दोन बळी
2 अजिंक्य रहाणे, पुजाराची चूक पडली महागात
3 IND vs AUS: चालू सामन्यात भारताला नवा धक्का; दुखापतग्रस्त गोलंदाजाने धरली हॉस्पिटलची वाट
Just Now!
X