06 March 2021

News Flash

मुंबईकर श्रेयसचा धमाका! T20मध्ये केला धोनी, विराटलाही न जमलेला विक्रम

त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने २० षटकात २५८ धावांचा डोंगर उभारला

श्रेयस अय्यर

मुंबईमध्ये सुरु असलेल्या सय्यद मुश्ताक टी २० क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी श्रेयस अय्यरने याने धमाकेदार खेळी करत भल्याभल्यांना आश्चर्यचकित केले. सिक्कीम विरुद्धच्या सामन्यात त्याने केवळ ५५ चेंडूत १४७ धावा तडकावल्या. या खेळीसह टी २० क्रिकेटमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या उभारणारा भारतीय खेळाडू होण्याचा त्याने मान मिळवला. त्याबरोबरच या सामन्यात मुंबईने सिक्कीमवर १५४ धावांनी विजय मिळवला.

या बरोबरच श्रेयस अय्यरने महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली या सारख्या दिग्गजांना न करता आलेला विक्रम करून दाखवला. आतापर्यंत टी २० सामन्यात सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या नाबाद १२८ होती. ऋषभ पंतने ही खेळी IPL २०१८ मध्ये साकारली होती. या यादीत मुरली विजय १२७ धावांसह तिसऱ्या स्थानी आहे. त्याने चेन्नई संघाकडून खेळताना IPL २०१० साली ही खेळी केली होती. या यादीत श्रेयस अय्यर अव्वलस्थानी विराजमान झाला आहे. श्रेयसने ५५ चेंडूंत ७ चौकार व १५ षटकार खेचून १४७ धावा तडकावल्या.

नाणेफेक जिंकून अजिंक्य रहाणे व पृथ्वी शॉ यांनी मुंबईच्या डावाला सुरुवात केली. पण मुंबईच्या २२ धाव असताना हे माघारी परतले.त्यानंतर श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांनी चौकार-षटकारांची आतषबाजी केली. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी २१६ धावांची भागीदारी केली. सूर्यकुमारने ३३ चेंडूंत ८ चौकार व २ षटकार लगावून ६३ धावा केल्या. तर श्रेयसने ५५ चेंडूंत ७ चौकार व १५ षटकार खेचून १४७ धावा तडकावल्या. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने ४ बाद २५८ धावांचा डोंगर उभारला.

टी २० क्रिकेटमध्ये भारताकडून ही दुसऱ्या क्रमांकाची सवोत्तम धावसंख्या ठरली. या यादीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ अव्वल आहे. २०१३ मध्ये बंगळुरू संघाने पुण्याच्या संघाविरुद्ध ५ बाद २६३ धावा केल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2019 5:45 pm

Web Title: syed mushtaq ali trophy mumbai batsman shreyas iyer becomes highest scorer in indias t20 history with 55 balls 147 runs
Next Stories
1 शतकी खेळीच्या जोरावर पुजाराला मानाच्या यादीत स्थान
2 पांड्या-राहुल प्रकरणात लोकपालाची नेमणूक
3 IND vs AUS : हार्दिक पांड्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून बाहेर
Just Now!
X