ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या पाश्र्वभूमीवर भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी उत्सुक खेळाडूंसाठी उत्तम व्यासपीठ असलेल्या मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेच्या अंतिम लढतीत बडोदा संघासमोर उत्तर प्रदेशचे आव्हान आहे.

अष्टपैलू आणि कर्णधार इरफान पठाण बडोद्यासाठीची जमेची बाजू आहे. बडोद्याकडून हार्दिक पंडय़ा छाप उमटवण्यासाठी आतूर आहे. सुरेश रैना, पीयुष चावला आणि प्रवीण कुमार या अनुभवी त्रिकुटावर उत्तर प्रदेश संघाची धुरा आहे.

संघ-

बडोदा : इरफान पठाण (कर्णधार, दीपक हुडा, रिशी अरोठे, भार्गव भट्ट, केदार देवधर, मृणाल देवधर, अभिजीत करंबेळकर, धीरेन मिस्त्री, हार्दिक पंडय़ा, मुनाफ पटेल, युसुफ पठाण, पीनल शाह, अतित शेठ, स्वप्निल सिंग, सोएब ताई.

उत्तर प्रदेश : सुरेश रैना (कर्णधार) प्रशांत गुप्ता, अक्षदीप नाथ, शुभम चौबे, पीयुष चावला, सौरभ दुबे, एकलव्य द्विवेदी, कुलदीप यादव, प्रवीण कुमार, मोहम्मद जावेद, अंकित राजपूत, समर्थ सिंग, सौरभ कुमार, उमंग शर्मा, रिंकू सिंग.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स ४ वाहिनीवर

वेळ : संध्याकाळी ६.३० पासून