News Flash

सिंथेटिक ट्रॅक नसूनही औरंगाबादच्या तेजस शिरसेने मिळवले रौप्य पदक

औरंगाबादेत धावपटूंना सरावासाठी सिंथेटिक ट्रॅक नसल्यामुळे ते मागे पडतात याचे एक ठळक उदाहरण म्हणजे तेजस शिरसे.

औरंगाबादेत धावपटूंना सरावासाठी सिंथेटिक ट्रॅक नसल्यामुळे ते मागे पडतात याचे एक ठळक उदाहरण म्हणजे तेजस शिरसे. या देवगिरी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला खेलो इंडीया या पुण्यात नुकत्याच पार पाडलेल्या स्पर्धेत केवळ १० मायक्रोसेकंदांनी मागे राहिल्यामुळे रौप्य पदकावर समाधान मानावे लागले असा दावा त्याचे प्रशिक्षक सुरेंद्र मोदी यांनी केला आहे.

अॅथेलेटिक्स या क्रिडा प्रकारात धावण्यासोबतंच उंच उडी, लांब उडी, तिहेरी उडी आणि बांबू उडी असे प्रकार असतात. यामध्ये अडथळा शर्यत हा प्रमुख प्रकार शर्यतीमध्ये असतो. तेजस हा सध्या अडथळा शर्यतीतील उत्कृष्ट राष्ट्रीय खेळाडू आहे. तेजस अशोक शिरसे (१७) हा देवगाव रंगारी येथील अल्पभूधारक शेतकरी अशोक शिरसे यांचा मुलगा. यावर्षी शिरसे यांना कोणतैही पीक घेणे जमले नाही. त्याचे वडिल त्याला काबाडकष्ट करुन शिकवतात.

दौलताबाद येथे दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र पब्लिक स्कूलमधे इयत्ता १०वी चे शिक्षण घेताना त्या शाळेतील क्रिडा प्रशिक्षक शासकीय क्रिडा प्रबोधिनीचे प्रथम पदक मिळवलेल्या पूनम राठोड यांनी तेजस मधले धावपटूचे गुण ओळखले. त्यांनी केंद्रशासनाच्या साई क्रिडा प्रबोधिनीकडे त्याला पुढील सरावासाठी जाण्याचा सल्ला दिला. पण तेजसच्या दुर्देवाने साई क्रिडा प्रबोधिनीत त्याला शिकण्यासाठी तेथील शिक्षकांनी महिना ५ हजार रुपयांची लाच मागितली. या प्रकाराने खजील झालेल्या तेजस ला पूनम राठोड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रशिक्षणासाठी पाठवले.

या विद्यापीठात सर्व प्रकारच्या खेळाडूंना विनामूल्य प्रशिक्षण दिले जाते. विद्यापीठाचे क्रिडा संचालक डॉ. दयानंद कांबळे यांनी ही सुविधा खेळाडूंसाठी उपलब्ध करुन दिलेली आहे. त्याठिकाणचे प्रशिक्षक सुरेंद्र मोदी यांनी तेजस मधील गुण ओळखून तेजसला प्रोत्साहित केले. त्याचा सर्व खर्च उचलून तेजस कडून सराव करुन घेताच ११०मीटर्स धावण्याच्या शर्यतीत १४सेकंद ३६ सेकंदात त्याने २०१६मधे दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धांमधे सुवर्णपदक मिळवले.

यामुळे खेलो इंडीया स्पर्धेसाठी त्याची निवड झाली. खेलो इंडीयामध्ये तेजसने ११० मीटर्स अडथळयांच्या शर्यतीत रौप्य पदक पटकावले. १४सेकंद ४८मायक्रोसेकंद इतकावेळ त्याला लागला तर दिल्लीच्या रितेश चौधरीने प्रथम क्रमांक पटकावला होता. दोनच दिवसांपूर्वी छत्तीसगड मधील रायपूर येथे झालेल्या १६ व्या युथ चॅम्पियनशिप मधे त्याने दुसरे सिलव्हर मेडल मिळवले आहे.

या विषयी तेजसचे प्रशिक्षक सुरेंद्र मोदी म्हणाले की, मराठवाड्यातील अॅथलेटिक्सना सरावासाठी सिंथेटिक ट्रॅक नाही. त्यामुळे नियमित सरावासाठीही विद्यार्थ्यांना पुणे, नागपूर, मुंबई येथे जावे लागते. या कारणामुळे सराव करणार्‍या विद्यार्थ्यांना खूप ताण येतो. शासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

औरंगाबाद जिल्ह्याला सिंथेटिक ट्रॅक तत्वता:मंजुर झाला आहे. येत्या काही दिवसातच ७ कोटी रुपये निधी शासनाकडून मिळेल. असे क्रिडा आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी सांगितले
अशोक गिरी, जिल्हा क्रिडा अधिकारी, औरंगाबाद

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2019 6:00 pm

Web Title: synthetic track aurangabad tejas shirse
Next Stories
1 IND vs AUS : पहिल्या टी-20 सामन्याआधी धोनीची नेट्समध्ये फटकेबाजी
2 ISSF Shooting World Cup : अपूर्वी चंदेलाचा ‘सुवर्ण’वेध
3 विराटचा मैदानातील वावर एका योद्ध्याप्रमाणे – युजवेंद्र चहल
Just Now!
X