क्रिकेटच्या मैदानात गुरुवारपासून टी-१० लीगच्या नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. टी-२० सामन्याची लोकप्रियता पाहता या नव्या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आयोजकांना आशा आहे. टेन क्रिकेट लीग नावाने या स्पर्धेला सुरुवात झाली असून, १४ डिसेंबर ते १७ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत ६ संघ सहभागी आहेत. तीन दिवसात १० षटकांचे १३ सामने खेळवण्यात येणार आहेत. सर्व सामने शारजाच्या मैदानात रंगणार आहेत.

स्पर्धत  सहभागी संघ :
मराठा अरेबियन्स- वीरेंद्र सेहवाग (कर्णधार ), मोहम्मद आमिर, मोहम्मद शमी, इमाद वासिम, कामरान अकमल, शैमान अन्वर, जहूर खान, अॅलेक्सहेल, रॉस व्हायटली, लेंडल सिमंस, रिल रोसॉवू, हार्डर व्हिलजोएन, कृष्मार संतोकी, ड्वेन ब्रावो, रेवोलोफ, वान डेर मेरवे.

केरला किंग्ज- इयॉन मॉर्गन (कर्णधार), लियाम प्लंकेट, सोहेल तन्वीर, वहाब रियाज, रियान, बाबर हयात, किरॉन पोलार्ड, सॅमुअल बद्री, रियाद इमरिट, चॅडविक वॉल्टन, निकोलस पूरण, शाकिब अल हसन, पॉल स्ट्रेलिंग, रोहन मुस्तफा, इमरान हैदर.

पख्तुन्वा- शाहिद आफ्रिदी (कर्णधार), फखर झमान, अहमद शहजाद, ज्यूनिद खान, सोहेल खान, उमर गुल, मोहम्मद इरफान, शाहिन आफ्रिदी, ड्वेन स्मिथ, लीमन डेवसन, तमीम इक्बाल, नजीबुल्लाह झदरान, मोहम्मद नबी, अमजद जावेद, शकलेन हैदर.

पंजाबी लिजंड- शोएब मलिक (कर्णधार), हसन अली, उमर अकमल, मिसबाह उल हक, फहिम अश्रफ, उस्मा मीर, अब्दुल रझाक, ख्रिस जार्डन, अदिल रशिद, कॅरलोस ब्रेटवेटस, रंगना हेराथ, लूक रॉन्ची, झार्डन, शहिफ असादुल्लाह, गुलाम शबीर.

कोलंबो लायन्स- दिनेश चंडिमल (कर्णधार), शेहान जयसूर्या, दिलशान, रसीथ रॅम्बुकवेल्ला, भनूका, वानीडू हंसरंगा, अँजेलो परेरा, थिक्षिला डि सिल्वा, विश्वा फर्नांडो, सुचित्रा सेनानाईके, शेहान, लाहुरे, कौसन, अँजेलो परेरा, किथूरवान विथरंगे, अलंकारा असनका.

बंगाल टायगर्स- सरफराज अहमद (कर्णधार), मोहम्मद नवाझ, रुमान रईस, अन्वर अली, हसन खान, मुस्ताफिझूर रेहमन, सुनील नरेन, डॅरेन सॅमी, डॅरेन ब्रावो, जोन्सन चार्लेस, आंद्रे फ्लेचरस, टॉम कोल्हेर, कॅमरुन डेलपोर्ट, मोहम्मद नावीद, रमीझ शहजादे, नबील.

१४ डिसेंबरला बंगाल टायगर्स आणि केरला किंग्ज यांच्यात सलामीचा सामना खेळण्यात येईल. त्यानंतर दुसरा सामना हा विरेंद्र सेहवागचा मराठा अरेबियन्स आणि आफ्रिदीच्या पख्तुन्वा या संघात रंगणार आहे. १५ डिसेंबरला बंगाल टायगर्स विरुद्ध पंजाबी लिजंड, मराठा अरेबियन्स विरुद्ध कोलंबो लायन्स, पंजाबी लिजंड विरुद्ध केरला किंग्ज आणि पख्तुन्वा विरुद्ध कोलंबो लायन्स यांच्यात सामने खेळवले जातील. अ आणि ब गटात वर्गवारी करुन १६ डिसेंबरला सामने खेळवण्यात येतील. १७ डिसेंबरला उपांत्य आणि अंतिम सामने रंगणार आहेत.