News Flash

T20: बांगलादेशचा न्यूझीलंडवर ७ गडी राखून विजय

न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश पाच टी २० सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशनं विजय मिळवला.

NZ-VS-Ban
T20: बांगलादेशचा न्यूझीलंडवर ७ गडी राखून विजय (Photo- ICC Twitter)

न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश पाच टी २० सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशनं विजय मिळवला. बांगलादेश दौऱ्यावर असलेल्या न्यूझीलंडचा संघ ६० धावांवर सर्वबाद झाला. विजयासाठी बांगलादेशसमोर ६१ धावांचं आव्हान होतं. बांगलादेशने हे आव्हान ३ गडी गमवून ३० चेंडू राखून पूर्ण केलं. या विजयासह मालिकेत बांगलादेशनं १-० ने आघाडी घेतली आहे.

बांगलादेशच्या गोलंदाजीसमोर न्यूझीलंडच्या एकाही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही. दोन खेळाडू सोडले तर एकाही खेळाडूला दुहेरी धावसंख्या करता आली नाही. रचिन रविंद्र आणि कोल मॅकोनी यांना भोपळाही फोडता आला नाही. तर टॉम लॅथम आणि हेन्री निकोलस यांनी प्रत्येकी १८ धावा केल्या. बांगलादेशकडून मुस्ताफिजूर रहमानने ३, नसुम अहमदने २, शाकिब अल हसनने २, मोहम्मद सैफुद्दीननं २ आणि महेदी हसनने एक गडी बाद केला.

बांगलादेशची फलंदाजीही अडखळतच झाली. संघाची धावसंख्या १ असताना मोहम्मद नईम बाद झाला. त्यानंतर संघाची धावसंख्या ७ असताना लिटॉन दास १ या धावसंख्येवर बाद झाला. त्यानंतर शाकिब अल हसन आणि मुशिफिकर रहिमने चांगली फलंदाजी केली. शाकिब २५ धावा करून बाद झाला. त्यानंतर मुशिफिकर रहिम आणि महमुदुल्लाहने विजय मिळवून दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2021 6:31 pm

Web Title: t20 bangladesh beat new zealand by 7 wickets rmt 84
Next Stories
1 अजिंक्य रहाणे का महत्त्वाचा आहे? अजित आगरकर सांगतो…
2 Ind VS Eng 4th Test: लंडनमधील ओवल मैदान भारतासाठी कसं आहे?; गेल्या ५० वर्षात…!
3 चौथ्या कसोटीसाठी प्रसिद्ध कृष्णाचा समावेश; शार्दूल ठाकूर, उमेश यादवचं काय?
Just Now!
X