ख्राइस्टचर्च : कसोटी हा क्रिकेटचा मूळ प्रकार असून त्याला नाहीसे करून ट्वेन्टी-२० सामन्यांची संख्या वाढवली, तर ट्वेन्टी-२० सामन्यांनाच धोका निर्माण होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया न्यूझीलंडचे माजी गोलंदाज सर रिचर्ड हॅडली यांनी व्यक्त केली. गेल्या काही महिन्यांपासून पाचऐवजी चार दिवसांचे कसोटी सामने खेळवण्याच्या संकल्पनेविषयी अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी त्यांचे मत मांडले. ‘‘कसोटी हा क्रिकेटचा पाया आहे. त्याची जपणूक करणे आपले कर्तव्य असून चार दिवसांची कसोटी खेळवून चुरस कमी करू नये,’’ असे हॅडली म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 29, 2020 12:13 am