14 October 2019

News Flash

मुंबई ट्वेन्टी-२० लीग क्रिकेट : मुंबई पँथर्सची ठाणे स्ट्रायकर्सवर मात

मुंबई ट्वेन्टी-२० लीग क्रिकेटमध्ये ईगल ठाणे स्ट्रायकर्स संघाला सहा धावांनी पराभूत केले

| May 16, 2019 12:01 am

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : करण नांदेने साकारलेल्या तुफानी नाबाद अर्धशतकाला आतिफ अत्तरच्या भेदक गोलंदाजीची साथ लाभल्यामुळे नॉर्थ मुंबई पँथर्स संघाने बुधवारी मुंबई ट्वेन्टी-२० लीग क्रिकेटमध्ये ईगल ठाणे स्ट्रायकर्स संघाला सहा धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना मुंबई पँथर्सने साईराज पाटील (४६) आणि करण नांदे (नाबाद ५०) यांच्यामुळे २० षटकांत ८ बाद १९० धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर आदित्य तरे (७१) व कौशिक चिखलीकर (५६) यांच्या अर्धशतकांनंतरही स्ट्रायकर्सला २० षटकांत पाच फलंदाजांच्या मोबदल्यात १८४ धावांपर्यंतच पोहचता आले.

First Published on May 16, 2019 12:01 am

Web Title: t20 mumbai league mumbai panthers beat thane striker