News Flash

ट्वेन्टी-२० मालिकेसाठी धोनीच्या निवडीची अपेक्षा नव्हतीच -गांगुली

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी ट्वेन्टी-२० मालिकेसाठी महेंद्रसिंह धोनीची निवड व्हावी, अशी माझी अपेक्षा नव्हती.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी ट्वेन्टी-२० मालिकेसाठी महेंद्रसिंह धोनीची निवड व्हावी, अशी माझी अपेक्षा नव्हती. युवा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतला अधिकाधिक संधी देण्याचे संघ व्यवस्थापनाचे धोरण अत्यंत योग्य आहे, असे मत भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केले आहे.

३८ वर्षीय धोनीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भवितव्य हा सध्या क्रिकेटमधील चर्चेतील विषय आहे. यासंदर्भात गांगुली म्हणाला की, ‘‘वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेपासून निवड समिती ऋषभला पुरेशी संधी देत आहे. धोनीच्या प्रारंभीच्या काळात त्यालाही अशी संधी देण्यात आली होती.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2019 2:27 am

Web Title: t20 series dhoni india vs west indies akp 94
Next Stories
1 Pro Kabaddi 7 : मोक्याच्या क्षणी गुजरातची बाजी, बंगळुरु बुल्सवर मात
2 भारत अ संघाची आफ्रिकेवर मात, मालिकेत २-० ने आघाडी
3 Ind vs WI : मैदानात पाऊल ठेवताच विराटच्या नावे विक्रम, दिग्गज कर्णधारांना टाकलं मागे
Just Now!
X