News Flash

T20 World Cup : स्पर्धा गाजवणारी शफाली फायनलमध्ये अपयशी

केवळ २ धावा करून परतली माघारी

T20 World Cup : स्पर्धा गाजवणारी शफाली फायनलमध्ये अपयशी
शफाली वर्मा

Women’s T20 World Cup 2020 Ind Vs Aus : टी २० विश्वचषक २०२० स्पर्धेत भारत विरूद्ध गतविजेता ऑस्ट्रेलिया यांच्यातील विजेतेपदाच्या लढाईत ऑस्ट्रेलियाने ४ बाद १८४ धावा ठोकल्या आणि भारताला १८५ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना स्पर्धा गाजवणारी शफाली वर्मा मोक्याच्या क्षणी अपयशी ठरली.

T20 World Cup Final : हरमनप्रीतसाठी अंतिम सामना ‘ट्रिपल स्पेशल’, कारण…

टी २० विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत पोहोचणारा भारत पहिला संघ ठरला होता. त्यात शफालीचे महत्त्वाचे योगदान होते. प्रत्येक सामन्यात शफालीने धडाकेबाज कामगिरी करत भारताला विजय मिळवून दिला. शफालीने पहिल्या सामन्यात २९, दुसऱ्या सामन्यात ३९, तिसऱ्या सामन्यात ४६ तर चौथ्या सामन्यात ४७ धावा केल्या. यात दोन सामन्यांमध्ये तिने सामनावीराचा किताब पटकावला. त्यामुळे टी २० विश्वचषक स्पर्धेत सध्या ती १६१ गुणांसह तिसऱ्या स्थानी होती. पण अंतिम सामन्यात ती ३ चेंडूत २ धावा करून बाद झाली. मेगन शूटच्या गोलंदाजीवर हेलीने तिचा झेल टिपत भारताला मोठा धक्का दिला.

त्याआधी, नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियन सलामीवीर बेथ मूनी आणि एलिसा हेली यांनी धडाकेबाज सुरूवात करत ५ षटकांत ४७ धावा ठोकल्या. क्रिकेटपटू मिचेल स्टार्कची पत्नी आणि ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची सलामीवीर एलिसा हेली हिने ३० चेंडूत धमाकेदार अर्धशतक ठोकले. तिने भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. याच सामन्यात तिने २ हजार टी२० धावांचा टप्पादेखील गाठला. धडाकेबाज अर्धशतकी खेळीनंतर एलिसा हेली झेलबाद झाली आणि भारताला पहिले यश मिळाले. तिने ३९ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकारांसह ७५ धावा केल्या.

T20 World Cup Final IND vs AUS Live : भारताची हाराकिरी

धडाकेबाज अर्धशतकी खेळीनंतर एलिसा हेली झेलबाद झाली आणि भारताला पहिले यश मिळाले. तिने ३९ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकारांसह ७५ धावा केल्या. त्यानंतर सलग तीन सामन्यांत चांगली कामगिरी करणाऱ्या सलामीवीर बेथ मूनीने या सामन्यात संयमी अर्धशतक केले. तुफान फटकेबाजी सुरू असताना दिप्ती शर्माने एकाच षटकात दोन बळी टिपले. आधी कर्णधार मेग लॅनिंग १६ धावांवर बाद झाली. पाठोपाठ गार्डनरही २ धावांत माघारी परतली. पण बेथ मूनीने नाबाद ७८ धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाला १८४ धावसंख्या गाठून दिली. संपूर्ण स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करणाऱ्या भारतीय गोलंदाजांनी अंतिम सामन्यात प्रचंड धावा खर्च केल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2020 2:53 pm

Web Title: t20 world cup 2020 final ind vs aus shafali verma falied in big match after superb tournament vjb 91
Next Stories
1 T20 World Cup Final : हेलीने महिला दिन गाजवला, माजी यष्टीरक्षकाचा विक्रम मोडला
2 T20 World Cup Final : एलिसा हेलीचा दाणपट्टा, भारतीय महिलांना चोपलं
3 T20 World Cup Final : हरमनप्रीतसाठी अंतिम सामना ‘ट्रिपल स्पेशल’, कारण…