News Flash

T20 World Cup Final : जाणून घ्या भारतीय महिलांच्या पराभवामागचं खरं कारण

अंतिम सामन्यात भारतीय फलंदाजी कोलमडली

T20 World Cup Final : जाणून घ्या भारतीय महिलांच्या पराभवामागचं खरं कारण

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला टी-२० विश्वचषकात पराभवाचा सामना करावा लागला. साखळी फेरीपर्यंत धडाकेबाज कामगिरी करणारा भारतीय संघ अंतिम फेरीत एकतर्फी पराभूत झाला. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेलं १८५ धावांचं आव्हान भारतीय महिलांना पेलवलं नाही. अवघ्या ९९ धावांत भारतीय संघ माघारी परतला आणि ऑस्ट्रेलियाने ८५ धावांनी विजय मिळवत आपलं पाचवं टी-२० विश्वविजेतेपद पटकावलं.

आतापर्यंत साखळी सामन्यांमध्ये फटकेबाजी करणारी शफाली वर्माही अंतिम सामन्यात अपयशी ठरली. अखेरच्या फळीत दिप्ती वर्मा, वेदा कृष्णमुर्ती आणि रिचा घोष या तिन्ही फलंदाजांचा अपवाद वगळता एकही फलंदाज ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा सामना करु शकल्या नाहीत. फलंदाजीतलं हेच अपयश भारतीय संघाच्या पराभवाचं कारण ठरलं आहे.

उपांत्य फेरीत पावसाने व्यत्यय आणल्यामुळे भारताला अंतिम फेरीत संधी देण्यात आली. इंग्लंडचं कडव्या आव्हानापासून एका अर्थाने भारतीय महिलांची सुटकाच झाली. शफाली वर्माने गेल्या ५ डावांमध्ये १६३ धावा केल्या, मात्र हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना आणि जेमायमा रॉड्रीग्ज या तिन्ही फलंदाजांनी गेल्या काही डावांमधली कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली. ही पाहा आकडेवारी…

ऑस्ट्रेलियाकडून मेगन शूटने ४, जेस जोनासनने ३ बळी घेतले. इतर गोलंदाजांनीही त्यांना उत्तम साथ दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2020 4:07 pm

Web Title: t20 world cup final dismal show by indian batsman led to defeat in final here is stats psd 91
Next Stories
1 दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, हार्दिक पांड्याचं पुनरागमन
2 T20 World Cup : स्पर्धा गाजवणारी शफाली फायनलमध्ये अपयशी
3 T20 World Cup Final : हेलीने महिला दिन गाजवला, माजी यष्टीरक्षकाचा विक्रम मोडला
Just Now!
X