News Flash

टोकियो ऑलिम्पिक : सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूला तामिळनाडू सरकारकडून मिळणार ३ कोटी!

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांची घोषणा

तामिळनाडू सरकार आणि टोकियो ऑलिम्पिक

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूंना तीन कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे शनिवारी खेळाडू व खेळाडूंसाठी आयोजित खास कोविड लसीकरण शिबिराला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. ऑलिम्पिक स्पर्धा पुढील महिन्यात २३ जुलैपासून सुरू होणार आहेत.

हेही वाचा – सेटे कॉली जलतरण स्पर्धा : साजनचे ऐतिहासिक यश

स्टॅलिन म्हणाले, ”ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक विजेत्यांना दोन कोटी रुपये रोख आणि कांस्यपदक विजेत्यांना एक कोटी देण्यात येणार आहेत.” नेत्रकुमानन, वरुण ठक्कर आणि तामिळनाडूतील के.सी. गणपती (नौकायन), जी. साथियान आणि शरथ कमल (टेबल टेनिस), सीए भवानी देवी (फेन्सिंग) आणि पॅरालिम्पियन टी. मारियप्पन यांनी ऑलिम्पिकसाठी पात्रता दर्शवली आहे.

सिंधू भारताची ध्वजवाहक?

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू आणि रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधूकडे टोक्यो ऑलिम्पिकसाठी भारतीय पथकाच्या ध्वजवाहकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पुरुष ध्वजवाहकाची जबाबदारी भालाफेकपटू नीरज चोप्रा, टेबल टेनिसपटू शरथ कमाल, कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि बॉक्सिंगपटू अमित पंघाल यांच्यापैकी एकाकडे सोपवली जाण्याची दाट शक्यता आहे.

यंदाच्या ऑलिम्पिकसाठी भारतीय पथकासह एक पुरुष आणि एक महिला अशा दोन ध्वजवाहकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा महिनाअखेरीस होणार आहे. मागी ऑलिम्पिक स्पध्रेत भारताच्या दोन जणांनी पदके जिंकली होती. यापैकी साक्षीला यंदा ऑलिम्पिक पात्रता गाठण्यात अपयशी आले आहे. त्यामुळे महिला ध्वजवाहकाच्या शर्यतीत सिंधूला आव्हान नसेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2021 3:36 pm

Web Title: tamil nadu announces rs 3 crore for athletes who won gold in tokyo olympics adn 96
Next Stories
1 VIDEO : बायकोच्या दबावापुढे झुकला ‘सिक्सर किंग’ युवराज सिंग..! बदलला आपला लूक
2 Euro Cup २०२०: नेदरलँड विरुद्ध चेक रिपब्लिक सामना; तर बेल्जियमसमोर पोर्तुगालचं कडवं आव्हान
3 Euro Cup 2020 : ऑस्ट्रियाला हरवून इटलीची उपांत्यपूर्व फेरीत धडक; अतिरिक्त वेळेत २-१ने पराभव
Just Now!
X