वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आणि नागपूर जिल्हा फुटबॉल संघटनेच्या यजमानपदाखाली संतोष करंडक फुटबॉल स्पध्रेत आजच्या तामिळनाडू विरुध्द गोव्याच्या सामन्यात दोन्ही संघाचे खेळाडू गोल करण्यात अयशस्वी ठरले. मात्र, तामिळनाडूची गुणसंख्या गोव्याच्या तुलनेत १ ने समोर असल्याने तामिळनाडूने आपले वर्चस्व कायम राखले.

मोतीबागेतील दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या मदानावर हा सामना आज पार पडला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच तामिळनाडूच्या खेळाडूंनी आक्रमक खेळीचे प्रदर्शन केले. सामना सुरू होताच १० व्या मिनिटाला जर्सी नंबर ८ एडव्हिनने ‘डी’च्या बाहेरून सुंदर शॉट मारला. मात्र, गोव्याच्या गोलरक्षकाने त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. त्यानंतर पुन्हा १७ व्या मिनिटाला तामिळनाडूच्या जर्सी नंबर १७ जॉफिनने हाफ डीच्या बाहेरून गोल करण्यासाठी गोलपोस्टपर्यंत बॉल आणला अन् शॉट मारला. मात्र, पुन्हा त्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. हाफ टाईमनंतर गोव्याच्या जर्सी नंबर १० फर्नाडिसने गोलरक्षकाच्या डाव्या बाजूने येत सुंदर शॉट मारला. मात्र, तामिळनाडूच्या गोलरक्षक जर्सी नंबर १ ए.अरुण प्रदीपने झेप घेत बॉल पकडला. आपल्या चांगल्या खेळीसाठी तामिळनाडूच्या जर्सी नंबर १९ एस.संतोषकुमारला मॅन ऑफ दि मॅच देण्यात आले. सामना बरोबरीत झाला असला तरी तामिळनाडूने आपल्या गुणांमध्ये वर्चस्व कायम राखले. आज महाराष्ट्र विरुध्द सíव्हसेस, असा सामना दुपारी ३.३० ला मोतीबाग मदानावर होणार आहे.

विद्यापीठाच्या मदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात आज पंजाब विरुध्द आसाम, अशी लढत झाली. यात पंजाबने आसामवर २-० ने विजय मिळवला. यात पंजाबच्या विजयकुमारने ११ व्या मिनिटाला गोल केला, तर पंजाबच्याच पवनकुमारने ७६ व्या मिनिटाला गोल करून आसामला रोखले. विजयकुमारला मॅन ऑफ दि मॅच देण्यात आले. विद्यापीठाच्या मदानावर जम्मू-काश्मीर विरुध्द मिझोरम, असा सामना होईल.