News Flash

तानिया सचदेवला रौप्यपदक

भारताची महिला ग्रँडमास्टर तानिया सचदेव हिने आशियाई उपखंड महिला जलद बुद्धिबळ अजिंक्यपद स्पध्रेत सहा गुणांसह रौप्यपदक पटकावले.

| August 13, 2015 06:47 am

भारताची महिला ग्रँडमास्टर तानिया सचदेव हिने आशियाई उपखंड महिला जलद बुद्धिबळ अजिंक्यपद स्पध्रेत सहा गुणांसह रौप्यपदक पटकावले. सातपैकी पाच लढतींत विजय आणि दोन सामने बरोबरीत सोडवून तिने आपल्या खात्यात सहा गुणांची कमाई केली. सचदेवने चीनच्या तान झोंगीइसह संयुक्त स्थान पटकावले होते, परंतु टायब्रेकरमध्ये सचदेवला विजयी घोषित करण्यात आले. खुल्या गटात भारताच्या संदीपन चंडानेही रौप्यपदकाची कमाई केली, तर ग्रँडमास्टर देबाशिष दासने याच गटात कांस्यपदक जिंकले. महिला गटात ग्रँडमास्टर द्रोणावली हरिकाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2015 6:47 am

Web Title: tania get silver medal
Next Stories
1 ऑस्ट्रेलिया ‘अ’चा शानदार विजय
2 मुंबई हॉकी असोसिएशन निवडणूक : सत्ताधाऱ्यांचे संस्थान कायम
3 ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघात अगर आणि बर्न्‍स
Just Now!
X