News Flash

मंजिल अभी बहुत दूर है!

वयाच्या सातव्या वर्षी गो-कार्टिगपासून मोटारस्पोर्ट्स खेळाला सुरुवात करणाऱ्या सेबॅस्टियन वेटेलने कधीही फॉम्र्युला-वनपर्यंत जाण्याचे स्वप्न पाहिले नव्हते.

| October 28, 2013 03:23 am

वयाच्या सातव्या वर्षी गो-कार्टिगपासून मोटारस्पोर्ट्स खेळाला सुरुवात करणाऱ्या सेबॅस्टियन वेटेलने कधीही फॉम्र्युला-वनपर्यंत जाण्याचे स्वप्न पाहिले नव्हते. कुटुंबीयांची मेहनत, त्याग, अपार कष्ट आणि वेगावर असलेली श्रद्धा या बळावर वेटेलने फॉम्र्युला-वनमध्ये घेतलेली भरारी कौतुकास्पद आहे. वयाच्या २४व्या वर्षी तो फॉम्र्युला-वनमधील वेगाचा बादशाह ठरला आहे. २०१० ते २०१३ अशा चार वर्षांत त्याने सलग चार विश्वविजेतेपदे पटकावली. रविवारी त्याने इंडियन ग्रां. प्रि.चे जेतेपद पटकावून सलग चौथ्या विश्वविजेतेपदाला गवसणी घातली.
*विश्वविजेतेपद पटकावल्यानंतर तुझी पहिली प्रतिक्रिया काय आहे?
जगातील सर्वोत्तम ड्रायव्हर्सविरुद्ध शर्यत जिंकणे, ही साधी गोष्ट नाही. तगडय़ा प्रतिस्पध्र्यामधून अव्वल स्थान पटकावणे, हे माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. कमी वयात मी उत्तुंग शिखर गाठले तरी मी अद्याप म्हातारा झालेलो नाही. अद्याप यशाची बरीच शिखरे मला सर करायची आहेत. सलग चौथ्या विश्वविजेतेपदामुळे मी प्रचंड खूश आहे. फक्त इतक्यावरच थांबून मला चालणार नाही. गेले वर्ष माझ्यासाठी जास्त संस्मरणीय होते. या वर्षीच्या जेतेपदाने हुरळून न जाता मला पुढील मोसमावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. अजून सर्वोत्तम कामगिरी मला साकारायची आहे. ‘मंजिल अभी बहुत दूर है..’
ल्ल  शर्यत जिंकल्यानंतर तू खाली उतरून कारला नमस्कार केलास, तेव्हा तुझ्या भावना काय होत्या?
आपल्या गुणवत्तेला मर्यादा असतात. कार जास्तीत जास्त जलद वेगाने पळावी आणि कारकडून पूर्ण सहकार्य मिळावे, हीच माझी अपेक्षा असते. वेगवान कारमुळेच मी विश्वविजेतेपद जिंकू शकलो आणि त्यामुळेच कारला मी नमस्कार केला. भारतातील लोकांविषयी मला सहानुभूती आहे. येथील बरीच जनता अजूनही दारिद्रय़रेषेखाली जगत आहे. जीवनाशी संघर्ष करत ते मला प्रोत्साहन द्यायला इथपर्यंत येतात. त्यांच्या भावनांचा मी नेहमीच आदर करतो. येथील लोक फारच प्रेमळ आहेत. भारतीय चाहत्यांच्या प्रेमामुळेच मला भरून आले. सलग तीन वेळा जेतेपद पटकावल्यामुळे भारत हे माझ्यासाठी विशेष ठिकाण बनले आहे.
* तुझ्या कारकिर्दीचा प्रवास कसा होता?
वडिलांच्या आग्रहाखातरच मी सातव्या वर्षी गो-कार्टिगकडे वळलो. माझे इतर मित्र फुटबॉल खेळायचे. पण मी मात्र मोटारस्पोर्ट्समध्ये कारकीर्द घडवण्याचे निश्चित केले. घरच्यांनी माझ्यासाठी बराच त्याग केला. त्यांनी माझ्यावर कधीही दडपण आणले नाही. कठोर मेहनतीनंतर मी फॉम्र्युला-वनमध्ये पोहोचल्यावर घरच्यांनी घर सोडून माझ्याबरोबर राहणे पसंत केले. मी आज जरी यशस्वी ड्रायव्हर म्हणून ओळखला जात असलो तरी त्यामागील अपार मेहनत महत्त्वाची आहे. सर्किटवर मी जीवापाड प्रेम करतो. शर्यतीच्या आदल्या दिवशी मी रात्री थांबूनही ट्रॅकचा आढावा घेत असतो. त्याचबरोबर संघातील अधिकाऱ्यांसोबत रणनीतीविषयी चर्चा करत असतो.
*सद्य:स्थितीला तुला कोणता प्रतिस्पर्धी आव्हानात्मक वाटतो?
फर्नाडो अलोन्सोचा खेळ पाहून मी माझी कारकीर्द घडवत आलो. माझ्यासाठी तो कायम आव्हान निर्माण करत आला आहे. माझ्यापेक्षाही अलोन्सो गुणवान आणि अनुभवी आहे. त्याने माझ्यापेक्षा जास्त यश संपादन करायला हवे होते. अनेक प्रतिभावान ड्रायव्हर्समध्ये विश्वविजेतेपदाला गवसणी घालण्याची क्षमता आहे. लुईस हॅमिल्टनमध्ये ठासून गुणवत्ता भरली आहे. मार्क वेबर आणि निको हल्केनबर्ग यांनाही कमी लेखून चालणार नाही. किमी रायकोनेन हा सध्या चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे पुढील वर्षीसाठी सज्ज होताना मला या प्रतिस्पध्र्यासह नव्या आव्हानांचा आणि नव्या नियमांचा अभ्यास करावा लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2013 3:23 am

Web Title: target still at distance indian grand prix four times champion sebastian vettel
Next Stories
1 महिलांमध्ये कविता राऊत अग्रेसर
2 सचिनसोबतचे क्षण प्रेरणादायी -सिद्धेश लाड
3 मानापमान नाटय़!
Just Now!
X