News Flash

रामकुमारला विशेष प्रवेशिका

टाटा खुली महाराष्ट्र टेनिस स्पर्धा ३ फेब्रुवारीपासून

रामकुमारला विशेष प्रवेशिका

टाटा खुली महाराष्ट्र टेनिस स्पर्धा ३ फेब्रुवारीपासून

मुंबई : पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात ३ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या टाटा खुल्या महाराष्ट्र एटीपी टेनिस स्पर्धेसाठी प्रज्ञेश गुणेश्वरन आणि सुमित नागल यांना मुख्य स्पर्धेसाठी थेट प्रवेश देण्यात आला असून, रामकुमार रामनाथनला तीनपैकी एक विशेष प्रवेशिका देण्यात आली आहे. या स्पर्धेत भारताकडून एकूण ११ स्पर्धक सहभागी होतील, अशी अपेक्षा स्पर्धा संयोजक प्रशांत सुतार यांनी व्यक्त केली.

सध्या जागतिक क्रमवारीत १८५व्या स्थानावर असलेला २५ वर्षीय रामकुमार यंदा तिसऱ्यांदा या स्पर्धेत सहभागी होणार आहे. यंदा प्रथमच भारताच्या दोन टेनिसपटूंना मुख्य स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला आहे, अशी माहिती सुतार यांनी दिली.

टाटा खुल्या स्पर्धेच्या तिसऱ्या हंगामाच्या विशेष प्रवेशिका जाहीर करताना महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेचे अध्यक्ष भरत ओझा म्हणाले की, ‘‘ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेहून परतलेल्या अनेक नामांकित खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागासाठी विशेष प्रवेशिकांची विनंती केली आहे. त्यामुळे दोन दिवसांत सर्व विनंती अर्जावर विचार करून दोन विशेष प्रवेशिका आणि दोन पात्रता फेरीतील प्रवेशिकांची नावे निश्चित करू. कारकीर्दीतील अखेरच्या हंगामात खेळणाऱ्या लिएण्डर पेसनेही पुरुष दुहेरीच्या विशेष प्रवेशिकेसाठी विनंती केली आहे. त्यामुळे त्याच्या नावाचा आम्ही सकारात्मक विचार करू.’’

गतवर्षी रोहन बोपण्णा आणि दिविज शरण जोडीने दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते. मात्र यंदा बोपण्णा अर्जुन कढेच्या साथीने खेळणार असून, ही जोडीसुद्धा विशेष प्रवेशिकेच्या प्रतीक्षेत आहे. पूरव राजा आणि रामकुमार तसेच जीवन नेदुनशेझियान आणि एन. बालाजी या जोडय़ासुद्धा स्पर्धेत खेळण्यासाठी उत्सुक आहेत, असे ओझा यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2020 3:18 am

Web Title: tata open maharashtra tennis tournament from 3rd february 2020 zws 70
Next Stories
1 रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : महाराष्ट्र सलग तिसऱ्या विजयाच्या दिशेने
2 VIDEO :  हा व्हिडीओ पाहाच तुम्ही ही न्यूझीलंडच्या खेळाडूंचं कौतुक कराल
3 IND vs NZ : सुपर ओव्हरमध्ये हरणं न्यूझीलंडसाठी नवं नाही; वाचा इतिहास…
Just Now!
X