टाटा स्टील तारापूर संघाने टाटा स्टील जमशेदपूर संघाचा २१-२० असा एका गुणानी पराभव करत २६व्या आंतरकंपनी कबड्डी स्पर्धेचे जेतेपद पटकावले. तारापूर संघातर्फे तुषार पाटील आणि राजेंद्र देशमुख यांनी सुरेख खेळ केला. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत टाटा मोटर्स, पुणे संघाने टाटा पॉवर, मुंबई संघावर ३१-२० अशी ९ गुणांनी मात केली. किशोर मुसळेचा चमकदार खेळ हे टाटा मोटर्स(पुणे)च्या विजयाचे वैशिष्टय़ ठरले. विजेत्या संघाला ज्येष्ठ क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला कबड्डीपटू रघुनाथ माने उपस्थित होते. किशोर मुसळेला उत्कृष्ट चढाईपटू पुरस्काराने गौरवण्यात आले. स्पध्रेतील शिस्तबद्ध संघ म्हणून टाटा सन्स (मुंबई) संघाची निवड झाली.