टाळेबंदीच्या कालखंडात बिगरकरारबद्ध आणि युवा (१९ वर्षांखालील) क्रिकेटपटूंना मानसिक सामर्थ्यांचे धडे आवश्यक आहेत, असे मत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख आणि भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने व्यक्त केले आहे.

सद्य:स्थितीत खेळाडूंच्या कारकीर्दीपुढे अनिश्चितता पसरली आहे. त्यामुळे त्यांच्यावर मानसिक परिणाम होऊ शकतो, असे द्रविडने राजस्थान रॉयल्सतर्फे आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये सांगितले.

‘‘सध्याच्या युवा क्रिकेटपटूंना भेडसावणाऱ्या समस्यांची माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षकांना पुरेशी माहिती नाही. त्यांना व्यावसायिक मार्गदर्शन करणे, हेच महत्त्वाचे ठरेल,’’ असे द्रविडने सांगितले.