28 February 2021

News Flash

शिक्षक दिन विशेष – आचरेकर सरांचा ‘हा’ धडा कधीच विसरणार नाही – सचिन

जेव्हा आचरेकर सर सचिनला सर्वांसमोर ओरडतात

रमाकांत आचरेकर सर आणि सचिन तेंडुलकर ( संग्रहीत छायाचित्र )

क्रिकेटच्या पंढरीतील ‘देव’ अर्थात सचिन तेंडुलकर आणि त्याचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचं नातं सर्वश्रुत आहे. आचरेकर सरांनी केलेल्या संस्कारांचे दर्शन सचिनच्या कृतीतून वारंवार घडते. देशभरात आज शिक्षक दिन साजरा केला जातोय. या पार्श्वभूमीवर सचिनने आपल्या ट्विटर अकाऊंटवर आचरेकर सरांची आठवण सांगणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

शारदाश्रम शाळेच्या ज्युनिअर क्रिकेट संघाकडून सचिन खेळायचा. यावेळी सचिनला प्रशिक्षण देणाऱ्या आचरेकर सरांनी त्याच्यासाठी खास एका सराव सामन्याचं आयोजन केलं होतं. त्याचवेळी सचिनचा सिनिअर संघ वानखेडे मैदानावर हॅरिस शिल्डचा सामना खेळत होता. लहानपणी खोडकर असलेला सचिन आचरेकर सरांचा आदेश धुडकावून सिनिअर संघाचा सामना बघायला गेला. हे आचरेकर सरांना समजलं. त्यानंतर नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी सचिनचा हा व्हिडीओ नक्की पाहा.

“सर मला सर्वांसमोर ओरडले. तुला दुसऱ्यांसाठी टाळ्या वाजवण्याची गरज नाही. आधी स्वतःचा खेळ सुधार, मग लोक तुझ्यासाठी टाळ्या वाजवायला येतील. तो माझ्यासाठी सगळ्यात मोठा धडा होता, यानंतर मी एकही सामना चुकवला नाही”, असं म्हणत सचिननं शिक्षक दिनानिमित्त आठवणींना उजाळा दिला. ज्या वानखेडे मैदानावर आचरेकर सर सचिनला सर्वांसमोर ओरडले, त्याच मैदानावर सचिनने २०११ चा विश्वचषक जिंकत आपल्या सरांचं स्वप्न साकारलं. सध्या सचिनच्या या व्हिडिओला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळतोय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2017 2:12 pm

Web Title: teachers day special former indian cricketer sachin tendulkar shares a incident with his childhood coach ramakant aachrekar
टॅग : Sachin Tendulkar
Next Stories
1 बांगलादेशात ऑस्ट्रेलिया संघाच्या बसवर दगड भिरकावला
2 मला माझे प्रशिक्षक आवडत नाहीत – पी.व्ही.सिंधू
3 ओल्टमन्स यांचा वारसदारासाठी हॉकी इंडियाची जाहीरातबाजी?
Just Now!
X