News Flash

मोठी बातमी..! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा

हैदराबादच्या प्रमुख क्रिकेटपटूला मिळाले संघात स्थान

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला आता फक्त काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. १८ ते २२ जून दरम्यान हा सामना इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली.

या सामन्यासाठी टीम इंडियाचे कर्णधारपद विराट कोहलीकडे, तर उपकर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आले आहे. सलामीवीर फलंदाज म्हणून रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांना संधी मिळाली आहे, तर केएल राहुल आणि मयंक अगरवाल यांना वगळण्यात आले आहे. मधल्या फळीत कोहली आणि रहाणे व्यतिरिक्त आधारस्तंभ चेतेश्वर पुजाराचा समावेश आहे. हनुमा विहारीलाही संधी मिळाली आहे.

हेही वाचा – आनंदाची बातमी..! राहुल द्रविड बनला टीम इंडियाचा नवा हेड कोच


यष्टीरक्षक म्हणून संघात ऋषभ पंत आणि वृद्धिमान साहा यांना स्थान मिळाले आहे. वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांना वगळण्यात आले असून रवींद्र जडेजा आणि आर अश्विनला संघात जागा मिळाली आहे. जलदगती गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादवला या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. मागील वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चमकदार कामगिरी केलेल्या हैदराबादच्या मोहम्मद सिराजलाही स्थान देण्यात आले आहे.

या सामन्यापूर्वी न्यूझीलंडने या सामन्यासाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. या संघात इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी असलेल्या २० लोकांच्या संघातून पाच खेळाडूंना वगळण्यात आले आहे.

भारतीय संघ-

रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धीमान सहा (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड संघ –

केन विल्यमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डेवोन कॉन्वे,कॉलिन डी ग्रॅन्डहोमे, मॅट हेनरी, काइल जेमिसन, टॉम लाथम, हेनरी निकोलस, एजाज पटेल, टीम साउदी, रॉस टेलर, नील वॅग्नर, बीजे वॉटलिंग, विल यंग.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2021 7:00 pm

Web Title: team india announce their 15 member squad for the wtc21 final adn 96
Next Stories
1 वेगवान गोलंदाजी आणि खतरनाक बाऊन्सरला सामोरं जात कोहलीची ‘विराट’ बॅटिंग..पाहा व्हिडिओ
2 EURO CUP 2020 : जर्मनी आणि फ्रान्स आमनेसामने, पराभवाचा वचपा काढण्यासाठी जर्मनी आतूर
3 आनंदाची बातमी..! राहुल द्रविड बनला टीम इंडियाचा नवा हेड कोच
Just Now!
X