News Flash

“भारतीय क्रिकेटपटूंना कधीही कमी समजू नका, कारण…”; ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाची कबुली

भारतीय संघातील युवा खेळाडूंबद्दल केलं महत्त्वाचं वक्तव्य

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३६९ धावा केल्या आणि भारताने प्रत्युत्तरात ३३६ धावा केल्या. त्यामुळे पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ३३ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने २९४ धावा करत भारताला विजयासाठी ३२८ धावांचे आव्हान दिले. भारतीय संघाने शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांच्या फलंदाजीच्या जोरावर ३२८ धावांचे कठीण आव्हान पार केलं. भारतीय संघातील अनेक बडे खेळाडू दुखापतग्रस्त झाले. नियमित कर्णधार मायदेशी परतला. तरीही टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या पराभवानंतर त्यांचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी महत्त्वाचे विधान केले.

मॅच जिंकण्यासाठी खेळायचं तेव्हाच ठरवलं- अजिंक्य रहाणे

ऑस्ट्रेलियन संघ नवख्या भारतीय संघाकडून पराभूत झाला. याबद्दल त्यांचं मत विचारण्यात आलं. त्यांनीही अगदी प्रामाणिकपणे उत्तर दिलं. “ही कसोटी मालिका अतिशय चुरशीची झाली. सामना म्हटला की कोणीतरी हारणार कोणीतरी जिंकणार. पण एक नक्की की कसोटी क्रिकेटचा आज विजय झाला. भारतीय खेळाडूंना या विजयाचं पूर्ण श्रेय दिलंच पाहिजे. त्यांनी अप्रतिम खेळी करून दाखवल्या. त्यांच्याकडून नक्कीच शिकण्यासारखं खूप काही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीयांना कधीही कमी समजू नये हे आम्हाला समजलं. कारण १.५ बिलियन इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या देशातून जर ११ लोकं खेळत असतील तर ते नक्कीच सर्वोत्तम ११ खेळाडू असणार हे आम्हाला आज पटलं”, अशी कबुली त्यांनी दिली.

शरद पवारांचे ‘टीम इंडिया’च्या विजयावर ट्विट, म्हणाले…

“ऋषभ पंतच्या खेळीने मला खूप प्रभावित केलं. पंतच्या खेळीमुळे मला बेन स्टोक्सची खेळी आठवली. पंत निर्भीडपणे आव्हानाला सामोरा गेला. सलामीवीर शुभमन गिलने दमदार कामगिरी करून दाखवली. तुम्ही कधीही कोणालाही गृहित धरू शकत नाही. आमच्या संघातील चारही गोलंदाज अनुभवी होते. पण हेच चार गोलंदाज चारही सामन्यात गोलंदाजी करताना दिसले. त्यांना फारशी विश्रांती मिळू शकली नाही. पण तरीदेखील विजयाचं श्रेय हे पूर्णपणे भारतीय संघाचंच आहे”, असं लँगर म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2021 5:16 pm

Web Title: team india beat australia justin langer openly admits fault also says never ever underestimate indians vjb 91
Next Stories
1 Ind vs Aus: …म्हणून भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर क्रिकेट चाहते मानतायत द्रविडचे आभार
2 रोज नवा हिरो सापडला अन् पोरांनी इतिहास घडवला
3 IND vs AUS: ऑस्ट्रेलियाच्या ३२ वर्ष अबाधित राहिलेल्या विक्रमाला ‘टीम इंडिया’चा धक्का
Just Now!
X