06 March 2021

News Flash

२०२० मध्ये ‘किंग कोहली’ च्या शतकाची पाटी कोरीच

पहिल्या कसोटी सामन्यानंतर विराट कोहली भारतात परतणार

करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे २०२० वर्ष हे सर्वांसाठी खूप कठीण गेलं. तब्बल ३-४ महिन्यांचा कालावधी आयसीसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने बंद ठेवले होते. कालांतराने या सामन्यांना सुरुवात झाली. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसाठी २०२० वर्ष हे कायम लक्षात राहणार आहे. कारण यंदाच्या वर्षात विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावता आलेलं नाही.

२०२० वर्षात विराट कोहली वन-डे, टी-२० आणि कसोटी क्रिकेट मिळून ३० डाव खेळला. परंतू एकाही डावांत त्याला शतक झळकावता आलेलं नाही.

अॅडलेड कसोटीच्या दुसऱ्या डावात भारतीय संघाचा डाव ३६ धावांत आटोपला. जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांनी भेदक मारा करत टीम इंडियाच्या दिग्गज फलंदाजांना झटपट माघारी धाडलं. पहिल्या डावात अर्धशतकी खेळी करणारा विराट दुसऱ्या डावात ४ धावा काढून बाद झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2020 11:41 am

Web Title: team india captain virat kohli 2020 year comes to an end without century psd 91
टॅग : Flashback 2020
Next Stories
1 दयनीय! भारताच्या कसोटी इतिहासात विराटसेनेची लाजिरवाणी कामगिरी
2 भारतीय संघानं लाज काढली; ४६ वर्षांपूर्वीचा लाजीरवाणा विक्रम मोडला
3 टीम इंडियावर नामुष्की, कांगारुंना विजयासाठी सोपं आव्हान; हेजलवूड-कमिन्सचा भेदक मारा
Just Now!
X