08 August 2020

News Flash

भारतीय संघ निघाला झिम्बाब्वे दौऱ्यावर

झिम्बाब्वे दौऱ्यावरील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील १५ सदस्यीय भारतीय संघाने रविवारी सकाळी मुंबईहून प्रयाण केले.

| July 22, 2013 05:40 am

झिम्बाब्वे दौऱ्यावरील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील १५ सदस्यीय भारतीय संघाने रविवारी सकाळी मुंबईहून प्रयाण केले. प्रेरणादायी संघनायक महेंद्रसिंग धोनीला राष्ट्रीय निवड समितीने विश्रांती दिल्यामुळे कोहलीकडे कर्णधारपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. निवड समितीने इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव या तीन वेगवान गोलंदाजांना आणि ऑफ-स्पिनर आर. अश्विनला विश्रांती दिली आहे.
तीन वर्षांनंतर भारतीय संघ आफ्रिकन राष्ट्राच्या क्रिकेट दौऱ्यावर जात आहे. जून २०१०मध्ये सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने झिम्बाब्वेत झालेल्या तिरंगी एकदिवसीय मालिकेत भाग घेतला होता. परंतु भारतीय संघाला अंतिम फेरी गाठण्यात त्यावेळी अपयश आले होते. ती स्पर्धा श्रीलंकेने जिंकली होती. परंतु त्यानंतर झालेल्या ट्वेन्टी-२० मालिकेत भारताने २-० असे निर्विवाद वर्चस्व गाजवले होते. त्यावेळी कोहली संघाचा उपकर्णधार होता. याशिवाय रवींद्र जडेजा, दिनेश कार्तिक, रोहित शर्मा आणि विनय कुमार हे सध्याच्या भारतीय संघातील खेळाडूही त्यावेळी झिम्बाब्वे दौऱ्यावर गेले होते.
भारतीय संघ पुढील प्रमाणे
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, दिनेश कार्तिक, चेतेश्वर पुजारा, सुरेश रैना, अंबाती रायुडू, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, परवेझ रसूल, मोहम्मद शामी, विनय कुमार, जयदेव उनाडकट आणि मोहित
शर्मा.
भारत-झिम्बाब्वे एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक :
२४ जुलै     पहिला सामना    हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
२६ जुलै     दुसरा सामना    हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
२८ जुलै     तिसरा सामना    हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
३१ जुलै     चौथा सामना    क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
५ ऑगस्ट    पाचवा सामना    क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2013 5:40 am

Web Title: team india depart for zimbabwe
Next Stories
1 राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धापुणेरी वर्चस्व!
2 हारून लॉरगट यांची दक्षिण आफ्रिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती
3 ‘आयसीसी’च्या ‘टॉप-१०’ कसोटी फलंदाजांच्या यादीत चेतेश्वर पुजारा
Just Now!
X