04 August 2020

News Flash

‘हे’ चालतं, मग धोनीच्या ‘त्या’ ग्लोव्ह्जला विरोध का केला?; नेटकरी ICC वर भडकले…

पाहा नक्की काय आहे प्रकरण

करोनाच्या धसक्यामुळे तब्बल तीन-चार महिने क्रिकेट सामने बंद होते. पण आता हळूहळू आंतरराष्ट्रीय क्रिकेट पूर्वपदावर येत आहे. ८ जुलै पासून इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज अशी ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय इसमाची पोलीस कोठडीत हत्या झाली. त्यामुळे कृष्णवर्णीय लोकांना पाठिंबा देण्याच्या दृष्टीने पहिल्या कसोटी सामन्यात विंडीजचे खेळाडू Black Lives Matter चा लोगो असलेली जर्सी घालून खेळणार आहेत. अमेरिकेतील या प्रकरणावर विंडीजच्या अनेक खेळाडूंनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर वर्णद्वेषा विरोधात आवाज उठवणं आमचं कर्तव्य असल्याचं विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरने सांगितलं.

ICC ने देखील हे लोगो असलेल्या जर्सी घालायला वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना परवानगी दिली. त्यानंतर ICC ला नेटकऱ्यांनी धोनीच्या खास ग्लोव्ह्जला विरोध केल्याची आठवण करून दिली. ICC ने राजकीय वाद आणि वर्णद्वेषाबाबत क्रीडांगणावर काही करण्यासाठी परवानगी देण्याची ही क्रिकेट इतिहासातील पहिलीच वेळ आहे. सोमवारी ICC ने विंडीजच्या खेळाडूंना ती जर्सी वापरण्यास परवानगी दिली. यानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा २०१९ च्या वर्ल्ड कपमधील एक वाद पुन्हा एकदा समोर आला. धोनीने स्पर्धेत ‘बालिदान बॅच’ असलेले ग्लोव्ह्ज वापरले होते. त्यावेळी राजकीय किंवा धार्मिक गोष्टींना परवानगी दिली जाणार नाही, असे सांगून ICC ने ते ग्लोव्ह्ज न वापरण्याचे आदेश दिले होते. या मुद्द्यावरून भारतीय चाहत्यांनी ICC वर संताप व्यक्त केला.

दरम्यान, २०१९ च्या क्रिकेट विश्वचषकात धोनीने यष्टीरक्षण करताना त्याने ‘बालिदान बॅज’ असलेले ग्लोव्ह्ज घातले होते. बलिदान बॅच हा जो पॅराट्रुपरचा इन्सिग्निया आहे. धोनीने आपल्या ग्लोव्ह्जवर जो बॅज लावला होता, तो फक्त पॅराट्रूपरच लावू शकतो. तो बॅच वापरून त्याने भारतीय सैन्याबद्दल आदर दाखविला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 6:21 pm

Web Title: team india fans slammed icc for being hypocrites on not allowing ms dhoni balidan badge insignia gloves but allowing black lives matter jersey vjb 91
Next Stories
1 करोनापाठोपाठ आणखी एक व्हायरस; हरभजन चीनवर संतापला…
2 विराट करायला गेला राहुलला ट्रोल; मिळालं ‘हे’ उत्तर
3 La Liga : मेस्सीचा धडाका सुरूच! केला एक नवा पराक्रम
Just Now!
X