News Flash

‘साहेबां’च्या भूमीत टीम इंडियाने फडकवला तिरंगा…

स्वातंत्र्यदिनी भारतीय संघाने इंग्लंडमध्ये केले ध्वजारोहण

साहेबांच्या भूमीत टीम इंडियाने फडकवला तिरंगा

सध्या भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ इंग्लंडच्या भूमीत आहे. या मालिकेतील 2 सामने झाले अडून त्यातील एक सामना भारताने लढत देऊन गमावला तर दुसऱ्या सामन्यात भारताला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. या कारणामुळे सध्या भारतीय चाहते काहीसे अस्वस्थ असून विराट सेना फॉर्ममध्ये येण्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

या दरम्यान, भारतीय संघ आणि सर्व भारतीयांना प्रेरणा देणारा क्षण आज संघातील खेळाडूंनी अनुभवला. आज भारताच्या स्वातंत्र्यदिनी भारतीय संघाने ध्वजारोहण केले. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कर्णधार विराट कोहली, प्रशिक्षक रवी शास्त्री आणि इतर सर्व संघ सदस्यांनी ध्वजारोहण केले आणि तिरंगा फडकावत वंदन केले. लंडनच्या ताज हॉटेल जवळ टीम इंडियाने ७२वा स्वातंत्र्य दिन साजरा केला. त्यानंतर पुढील कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया नॉटिंगहॅमला निघाली.

 

 

 

jai hind

A post shared by Ravindrasinh Jadeja (@royalnavghan) on

भारतीय संघातील काही खेळाडूंनी आपल्या टि्वटर आणि इन्स्टाग्राम अकाउंटवरून या संदर्भातील फोटो शेअर केले आहेत. लंडनच्या ताज लंडन हॉटेल जवळ टीम इंडियाने ७२वा स्वातंत्र्य दिन साजरा केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2018 5:48 pm

Web Title: team india flag hoisting in london england
टॅग : Bcci,Team India
Next Stories
1 …आणि आयसीसीच्या यादीत सगळेच फलंदाज झाले ‘नंबर १’
2 Ind vs Eng : ‘हार्दिक पांड्या ऑल राउंडर नाही’, हरभजन सिंगचे टीकास्त्र
3 Video : भारतीय चाहत्यांसाठी ‘टीम इंडिया’ने दिल्या आगळ्यावेगळ्या शुभेच्छा
Just Now!
X