News Flash

“बंद करो ये नंगा नाच”; ‘त्या’ फोटोवरून राहुल ट्रोल

'क्रिकेट आणि फलंदाजीचं काय?' असे प्रश्न संतप्त चाहत्यांनी विचारले

वेस्ट इंडिज अ विरुद्ध भारत हा ३ दिवसांचा सराव सामना अखेर अनिर्णित राहिला. टी २० आणि एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर या सराव सामन्यातील काही खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष होते. त्यानुसार चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा, उमेश यादव या खेळाडूंनी आपली चमक दाखवत कसोटी मालिकेसाठी आपण सज्ज असल्याचे दाखवून दिले. पण लोकेश राहुल मात्र या सान्यातही अपयशी ठरला.

टी २० मालिकेत रोहित शर्माला विश्रांती देऊन तिसऱ्या सामन्यात लोकेश राहुलला संधी देण्यात आली होती. पण त्या सामन्यात त्याने केवळ २० धावा केल्या. त्यानंतर एकदिवसीय मालिकेत त्याला संघात स्थान मिळाले नाही. तर सराव सामन्यात त्याने केवळ ३६ धावा केल्या. त्यामुळे त्याची विंडिज दौऱ्यातील कामगिरी अद्याप तरी चांगली झालेली नाही. तशातच सोशल मिडीयावर त्याने पोस्ट केलेल्या एका फोटोवरून लोकेश राहुल चांगलाच ट्रोल झाला आहे.

राहुलने स्वत:च्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये राहुल समुद्र किनाऱ्यावर बसला आहे. पण या फोटोवरून त्याला चांगलंच ट्रोल करण्यात येत आहे. क्रिकेट खेळायला गेला आहेस पण क्रिकेट आणि फलंदाजी दिसत नाहीये, असं एका नेटिझनने लिहिलं आहे. तर केवळ शॉर्ट्स घालून फोटो काढण्यात आल्यामुळे ‘बंद करो ये नंगा नाच’ असंही एका नेटिझनने लिहित संताप व्यक्त केला आहे

राहुलने ट्विट केलेला फोटो –

या फोटोवरून नेटिझन्सने राहुलला ट्रोल करत त्याची खिल्ली उडवली आहे.

दरम्यान, सराव सामन्याच्या पहिल्या डावात राहुल अपयशी ठरल्यानंतर त्याला दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी पाठवण्यात आले नाही. २२ ऑगस्टपासून भारत – विंडिज कसोटी मालिका सुरू होणार आहे. त्यामुळे या मालिकेसाठी लोकेश राहुलला संधी मिळणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2019 12:17 pm

Web Title: team india kl rahul troll on twitter photo post sea vjb 91
Next Stories
1 ‘महाराष्ट्रकन्या’ मोनिकाने रोवला अटकेपार झेंडा
2 मुंबईकर अजिंक्य रहाणेची दमदार खेळी
3 राजपूत, राठोड, अमरे अग्रेसर
Just Now!
X