B7XAM43CcAEqvVA.jpg largeटीम इंडिया शुक्रवारपासून सुरू होणाऱया तिरंगी मालिकेत नव्या लूकमध्ये दिसणार आहे. विश्वचषक स्पर्धेआधी भारतीय संघाच्या नव्या जर्सीचे अनावरण बीसीसीआयकडून करण्यात आले. या नव्या लूकसह नव्या दमाने टीम इंडिया पुन्हा एकदा विश्वचषक उंचावण्यास सज्ज झाली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर टीम इंडियाच्या या नव्या जर्सीचे अनावरण करण्यात आले. बीसीसीआयच्या ट्विटर अकाऊंटवर भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीसोबत भारतीय संघाच्या इतर खेळाडूंचे या नव्या जर्सीतील छायाचित्र ट्विट करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट स्टेडियमच्या छतावर उभे राहून टीम इंडियाच्या शिलेदारांनी नवी जर्सी परिधान केलेला व्हिडिओ देखील बीसीसीआयने ट्विट केला आहे.

जर्सीची वैशिष्ट्ये-
* जर्सीच्या कॉलर आणि स्लीव्हजवर भगव्या रंगाची किनार देण्यात आली आहे. तसेच पॅन्टच्या खिशालाही (लोअर पॉकेट) भगवी किनार आहे.
* जर्सीचा निळा रंग कायम ठेवण्यात आला असून नव्या जर्सीवर उभ्या रेषांची हलकी डिझाईन देण्यात आली आहे.
* सहारा कंपनीनंतर भारतीय संघाचे मुख्य प्रायोजकत्व ‘स्टार’ने घेतले आहे.
* जर्सी उत्पादनाचे अधिकार ‘नाइकी’ कंपनीकडे आहेत.

(छायाचित्र साभार- बीसीसीआय ट्विटर अकाऊंट)