भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ हा भारतीय क्रिकेटमधील उदयोन्मुख खेळाडूंपैकी एक मानला जातो. शॉ अजूनही टीम इंडियाकडून फारसे सामने खेळलेला नाही, पण त्याने आत्तापर्यंत भारताकडून खेळलेल्या सामन्यांमध्ये त्याने आपली प्रतिभा दाखवून दिली आहे. १९ वर्षाखालील क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर शॉ याने निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर त्याने २०१८च्या ICC १९ वर्षाखालील विश्वचषकात भारताला विजय मिळवून दिला.
२०व्या वर्षी पृथ्वी शॉ फलंदाजीत दमदार कामगिरी करताना दिसतो आहे. त्याच्या कामगिरीमुळे काही तरूणीही त्याच्या फॅन होताना दिसत आहेत. नुकतीच शॉ याच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरून तो अभिनेत्री प्राची सिंगला डेट करत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
प्राची ग्लॅमर इंडस्ट्रीत नवीन आहे आणि तिने आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात प्रसिद्ध मालिका ‘उडाण’पासून केली आहे. पृथ्वी शॉ च्या इंस्टाग्राम पोस्टवर प्राचीने पोस्ट केलेल्या कमेंटमुळे डेटिंगबद्दलच्या चर्चांना उधाण आल्याचं दिसत आहे.
प्राची सातत्याने पृथ्वी शॉ च्या पोस्टवर कमेंट्स करताना दिसते. पृथ्वी शॉ देखील प्राचीच्या कमेंट्सवर एकतर लाईक करतो किंवा रिप्लाय देतो असेही दिसून आले आहे.
पृथ्वी शॉ आणि प्राची दोघांनीही आपल्या नात्याबद्दल कधीही काहीही सांगितलेलं नाही. त्यामुळे ते एकमेकांना डेट करत आहेत की नाही याबद्दल अधिकृत माहिती नाही मात्र सोशल मीडियावरील त्यांच्या कमेंट्स पाहून चर्चांना उधाण आलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 10, 2020 10:28 am